'अभिनेता ' शेखर कपूर...


देव आनंदचा भाचा रोमॅन्टीक हीरो म्हणूनच सिनेमात पदार्पण करणार हे अगदीच स्वाभाविक आहे ना? तरीदेखील शेखर कपूर असे म्हणताक्षणी डोळ्यासमोर येते ते 'मासूम ', 'मिस्टर इंडिया ', 'बॅन्डिक्ट क्वीन ' अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा दिग्दर्शक. तीच त्याची चांगली ओळख.

'अभिनेता ' शेखर कपूर...

देव आनंदचा भाचा रोमॅन्टीक हीरो म्हणूनच सिनेमात पदार्पण करणार हे अगदीच स्वाभाविक आहे ना? तरीदेखील शेखर कपूर असे म्हणताक्षणी डोळ्यासमोर येते ते 'मासूम ', 'मिस्टर इंडिया ', 'बॅन्डिक्ट क्वीन ' अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा दिग्दर्शक. तीच त्याची चांगली ओळख. हाच शेखर कपूर खरं तर 'नायक ' म्हणून चित्रपटसृष्टीत आला होता हे फारच कमी जणांना माहिती असेल, पण तसा तो येणे स्वाभाविक होते. याचे कारण म्हणजे, तो चेतन, विजय आणि देव या आनंदबंधुंचा तो भाचा. याच आनंद बंधुंच्या नवकेतन फिल्मच्या 'जान हाजिर है ' ( १९७५) या चित्रपटाव्दारे शेखर कपूर अभिनयाच्या क्षेत्रात आला. जोडीला प्रेम किशन आणि नताशा हे नवीन चेहरे होते. मनोहरनाथ रंगरु दिग्दर्शित या चित्रपटाने मुंबईत जमुना थिएटरमध्ये मॅटीनी शोला तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. संगीतकार जयकुमार ( म्हणजे जय पार्टे) यांच्या हम ना रहेंगे तुम ना रहोगे, सावन आया बादल आये, अरे मेरी छम्मक छल्लो या गाण्यानी तेव्हा भरपूर लोकप्रियता संपादली. बिनाका गीतमालामध्येही या गाण्याना स्थान मिळाले हे त्या काळात यशाचे परिमाण मानले जाई... पहिलचं पिक्चर हिट झाला म्हणजे शेखर कपूरची फिल्मी सुरुवात चांगली झाली. त्यानंतर त्याला केतन आनंद दिग्दर्शित 'टूटे खिलौने ' ( १९७८)मध्ये शबाना आझमीचा नायकाची भूमिका मिळाली. खूपच मोठी संधी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


व्यक्ती विशेष , चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.