चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, त्याच्या स्वतःच्या अनुभव विश्वातून तो करत असलेली साहित्य निर्मिती व त्या साहित्य निर्मितीचे वाचकांवर होणारे परिणाम या आणि अशा अनेक गोष्टींच्या मागे दडलेल्या वास्तव आणि रंजकतेचं चित्रण चित्रपट माध्यमात झाल्याची उदाहरणं अगदी मोजकीच आहेत. लेखकाच्या कथनातून अनेक चित्रपट तयार झालेले असले तरीही लेखकाने लिखाणासाठी पात्र व त्यांच्या परिस्थितीचा घेतलेला धांडोळा द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी असं लांबलचक शीर्षक असलेल्या चित्रपटात आपल्याला पहायला मिळतो. द गर्नसी लिटररी अँड पोटॅटो पील पाय सोसायटी पुस्तक वाचकाशी संवाद साधतात, लेखकाचा अनुभव शब्दात मांडून वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. चित्रपटाच्या प्रेक्षकाला मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतून प्रतिमाच अवलोकन करावं लागतं. सराईत प्रेक्षक त्या प्रतिमां मागील अन्वयार्थ समजून घेतो. चित्रपट आणि साहित्य ही दोन्ही माध्यम प्रेक्षक व वाचकाला घडवत असतात, उन्नत करत असतात. चित्रपटाचा इतिहास उणापूरा एकशे तेवीस वर्षाचा आहे पण साहित्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. चित्रपटातील गोष्ट सांगण्याचा घटक साहित्याकडूनच आलेला आहे. जगभरात निर्माण झालेल्या साहित्यावर अनेक चित्रपटांच्या कथावस्तू उभ्या राहिल्या आहेत. मारिया पुझोच्या गॉडफादर पासून अँगथा क्रिस्तीच्या मर्डर ऑफ द ओरिएंटल एक्सप्रेस सारखी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील. चित्रपट आणि साहित्य याचं नात घट्ट असलं तरीही लेखक म्हणून एखाद्या व्यक्तीची होणारी जडणघडण, साहित्य लिहिण्यासाठी त्याला मिळणारी प्रेरणा, ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .