ह्रषिदांचा 'नौकरी
चित्रस्मृती ह्रषिदांचा 'नौकरी ' माहित्येय? राज कपूर व राजेश खन्ना होते.... ह्रषिकेश मुखर्जींच्या दिग्दर्शनातील राज कपूर असं म्हणताच पटकन 'अनाडी ' ( १९५९) आठवणारच. सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी... करीत विलक्षण भाबडा राज कपूर ( पडद्यावरील व्यक्तिरेखेनुसार अर्थातच) आणि केवळ नजरेने बोलणारी नूतन आठवणारच. ललिता पवारची मिस डिसाही लक्षवेधक ठरली. ह्रषिदांच्या 'आशिक '( १९६२) मध्येही राज कपूर होता. आणि ह्रषिदांच्या चित्रपटातील राजेश खन्ना असे म्हणताच आनंद ( १९७१), बावर्ची ( १९७२) आणि 'नमक हराम ' ( १९७३) असे चित्रपट आठवणार. ( काहीना 'नमक हराम ' म्हटलं की अमिताभ बच्चन आठवतो तो भाग वेगळा). पण तुम्हाला ह्रषिदांच्या चित्रपटात राज कपूर आणि राजेश खन्ना एकत्र आले असा चित्रपट आठवतोय? बघा थोडासा ताण देऊन... ह्रषिदांच्या असली नकली, सत्यकाम, गुड्डी, मिली, चुपके चुपके, अभिमान, खुबसुरत अशा अनेक चित्रपटांची अगदी सहज आठवण येतेच. अगदी त्यांचा रहस्यरंजक 'बुढ्ढा मिल गया 'देखिल आठवेल...पण 'नौकरी "? 'नमक हराम 'चेच निर्माते आरएसजे कम्बाईन 'नौकरी 'चे निर्माते होते. ह्रषिदांच्या या चित्रपटात राज कपूर आणि राजेश खन्ना एकत्र आले ही सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मोठी बातमी होती. आता आवर्जून उत्तरार्ध का म्हटलं? तर 'प्रेम कहानी ' ( १९७५), 'मेहबूबा ' ( १९७६) या आजही गाणी लोकप्रिय असलेल्या या चित्रपटांना रसिकांनी नाकारले आणि राजेश खन्नाचा 'पडता काळ ' सुरु झाला... अशा वेळी ह्रषिकेश मुखर्जींचा चित्रपट मिळणे आणि तोही राज कपूरसोबत ही खूपच आशादायक गोष्ट होती. जाहिरा नावाची एक अभिनेत्री होती ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .