सेन्सॉर नकोच.... कोणीतरी पाच ढुढ्ढाचार्य ठरवणार आपल्यासाठी काय चांगले आहे / नाही. तेसुद्धा सरकारच्या इच्छेप्रमाणे बदलणार...त्यांची धोरणे आणि कायद्याचे अर्थ बदलणार....त्यापेक्षा आपणच ठरवू काय बघायचे आणि काय नाही. स्वातंत्र्य त्यांनाही असावे...काहीही दाखवण्याचे. स्वातंत्र्य आपल्यालाही असावे...काय बघायचे/बघायचे नाही हे ठरवण्याचे.Sacred Games १ आणि २
- नेटफ्लिक्स वरील स्वातंत्र्याचा दुरुपयोग ✍ सुहास किर्लोस्कर सिनेमा बघण्याचे तंत्र बदलत आहे. आता इंटरनेट चॅनेल एकामागोमाग एक येत आहेत आणि आपल्याला बघण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध होत आहेत. आता कौशल्य आपलेच....काय बघायचे आणि काय नाही.....रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था झाली आहे. सिनेमा व्यतिरिक्त वेबसिरीज उपलब्ध होत आहेत. त्याचा मुख्य उद्देश तुम्हाला पुढील भाग बघायला भाग पाडणे. सहा तासाची कथा असेल तर सहा एपिसोड करता येतात आणि त्यात पाणी घालून दहा एपिसोड बनवता येतात. पाणी म्हणजे काय? तर हिंसाचार आणि सेक्स. कथेच्या अनुषंगाने याचा प्रवेश होत असेल तर माफ करता येते पण निव्वळ स्वातंत्र्य आहे म्हणून याचा वापर केला तर? सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित Sacred Games या वेबसिरीज मध्ये असाच हिंसाचार आणि सेक्सचा अतिरेक झाला आहे.....कथेची मागणी नसताना !* दिल्ली क्राईम ही वेबसिरीज स्वातंत्र्याचा चांगला उपयोग म्हणून बघता येईल....बघावीच. सॅक्रेड गेम्स ? वेळ जात नसला तरी या वेब चॅनेल वर अनेक पर्याय उपलब्ध आहेत....Drama, Action, Thriller, Classic, Suspense, Crime, Rom-Com, Historical Biographical, वगैरे. सेन्सॉर नकोच.... कोणीतरी पाच ढुढ्ढाचार्य ठ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .