बरान - माजिद मजिदी


बरानचा अर्थ पाऊस. तिचं नाव बरान असतं... लतीफ हा लेट लतीफ नसतो पण होतो. ठरवला जाण्यासाठी बहुधा. नाही पडला तरी किंवा न पडला तरी पावसाची वाट पाहणारा... म्हणजे तो जे करतोय ते प्रेमातल्या त्याग नावाच्या फिल्म गोष्टी पैक्षा किती तरी पुढचं प्रामाणिक आहे याची जाणीव नसलेला. किवा हे जे आहे ते प्रेम आहे तेही न समजणारा. यंदा मान्सुन लांबतोय. पडला तरी, नाही पडला तरी तो धुवून काढणारच आहे.  

बरान माजिद मजिदी

---- स्क्रीनवर पाटी येते “सोव्हिएत यूनियननं १९७९साली अफगाणिस्तानवर चढाई केली. त्यानंतर दहा वर्षांनी सोव्हियेत युनियन तिथून जाईस्तोर ह्या देशाच्या इतिहासातलं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. नागरीयुद्धानं सुरू झालेलं विनाशपर्व, तालिबानींची पुन्हा कसलेली पकड आणि त्यातच सलग तीन वर्षांचा भीषण दुष्ळाळ ही लाखो अफगाणींच्या स्थलांतराची प्रमुख कारणं ठरली. इराणमध्ये आजमितीस पंधरा लाखहून अधिक अफगाणी निर्वासित राहत असून, अफगाणींची स्वतःचं घर- देश न पाहिलेली एक आख्खी युवा पिढी निर्वासित म्हणून इराणमध्ये जन्माला आली असल्याचा अंदाज युनोनं वर्तविला आहे. ---- शेवटः कोसळणाऱ्या पावसानं धूवून निघत असलेले, चिखलात उमटलेला ‘बरान'च्या पावलाचा एक ठसा... त्याला पाहणाऱ्या लतीफच्या चेहेऱ्यावर पसरलेलं निरागस समाधानाचं स्मित. थिएटर सोडत असताना, एक प्रेक्षक दुसऱ्याला चुकचुकत म्हणतोय, “येडा, सगळं गमावून बसला...” तिचं नाव ‘बरान’ आणि बरानचा अर्थ बारीश... पाऊस... ---- सुरुवातः लतिफ भटारखान्यातीन रोट्या मोजून त्याचं गाठोडं पाठीवर घेतो. एक रोटी खात खात निघतो. एका तरुण इराणी जोडप्याची चाललेली थट्टा मस्करी पाहातो. एका पॉ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen