अमिताभचा 'पडता काळ '


चित्रस्मृती 

  अमिताभचा 'पडता काळ '   एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर 'गंगा जमुना सरस्वती '( १९८८)पासून त्याच्या फ्लाॅप चित्रपटांची रांग लागली ते दिवस आले असतील. या चित्रपटाचे अपयश अगदी ताजे असतानाच त्याच आठवड्याच्या इलेस्ट्रेटेड विकली या इंग्रजी साप्ताहिकाच्या कव्हरवरचा हताश अमिताभ आजही आठवतोय. 'माझे दिवस संपले ' असे त्याच्या मुलाखतीचे हेडिंग त्या कव्हरवरच होते. तर काहींच्या डोळ्यासमोर 'मृत्यूदाता ' ( १९९७) पासून त्याने गचाळ पटकथेवरील विस्कळीत चित्रपटात भूमिका केल्याने ओळीने त्याचे चित्रपट अपयशी ठरले तो 'बॅड पॅच ' आला असेलच. चित्रनगरीत 'कोहराम 'च्या मुहूर्ताला हजर राहिलो असता खुद्द अमिताभच्या देहबोलीत फारसा  आत्मविश्वास नसल्याचे जाणवले आणि आश्चर्य वाटले... पण अनेकांना तरी कल्पना आहे की, त्याच्या करियरची सुरुवातच ओळीने चित्रपट पडत पडत झाली. के. ए. अब्बास दिग्दर्शित 'सात हिन्दुस्तानी ' ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) यशस्वी ठरणे अवघडच होते. त्यानंतर तो खरं तर 'फोकस'मध्ये आला ह्रषिकेश मुखर्जींच्या 'आनंद '( १९७१) मध्ये, पहिले यश लाभले ते एस. रामनाथन दिग्दर्शित 'बाॅम्बे टू गोवा '( १९७२) मध्ये! तर त्याला अँग्री यंग मॅनची पाॅवरफुल इमेज मिळाली ती प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर ' ( १९७३) च्या खणखणीत यशाने..... पण याच प्रवासात त्याचे काही चित्रपट पडद्यावर आले तोच गेलेदेखिल. पण त्यातील दोन चित्रपटांची नावे आवर्जून घ्यायला हवीत,    रवि नगाईच दिग्दर्शित ' ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट जगत

प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      2 वर्षांपूर्वी

    इतकी अपयश पचवून हा माणूस सत्त्याहत्तऱ्यावया वर्षी अजून खणखणीत चालतोय हे महत्त्वाचंवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.