ॲक्शन, ॲक्शनपट आणि मराठी 


मोठ्या प्रमाणात ॲक्शनप्रेमी प्रेक्षकवर्ग असुनही मराठी चित्रपटसृष्टीत ॲक्शन बेतानेच असते. कारण, बजेट आणि कलाकारांची ॲक्शनप्रती असलेली अनास्था किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरीक तंदुरुस्तीचा अभाव. त्यामुळे मराठीत एकतर साहसदृश्य विरहीत हाणामारी असते किंवी असलीच तर आटोपशीर पद्धतीने त्याचे चित्रीकरण होते. त्यामुळे खुप मोठा सिनेप्रेक्षक वर्ग मराठी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात नाही. केवळ आशयघन चित्रपट, हे मराठी मागे लागलेले बिरूद तोट्याचे ठरते. आजही शंभरात जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरतात. त्यामुळेच कदाचित मोठ्या संख्येने सिनेरसिक हिंदी चित्रपटच पाहात असावा.

 

 

 ॲक्शन, ॲक्शनपट आणि मराठी

व्यावसायिक चित्रपट म्हटले की त्यात हाणामारी ही कुठेनाकुठे तरी येतेच. पूर्वी चित्रपटात हाणामारी, साहसदृश्ये अत्यल्प असायची. पण, चवीने पाहिली आणि चर्चिली जायची. कालांतराने त्याचे प्रमाण वाढत गेले. दारासिंग, धर्मेन्द्र हे नायक ताकदीच्या जोरावर ॲक्शनसीन द्यायचे कारण ते बलदंड शरीरयष्टीचे होते. पण, हिंदी सिनेमात खऱ्या अर्थाने अँग्री यंग मॅन हे बिरुद मिरवले ते अमिताभ बच्चन यांनी! दिवार, जंजीर, अमर अकबर अँथनी, पासून ते शहेनशहा पर्यंत बच्चन साहेबांनी सिनेमातील ॲक्शनस्टार म्हणून नाव कमावले. पण, कुली चित्रपटातील हाणामारीच्यावेळी त्यांना पुनीत इस्सार ह्या दुय्यम कलाकाराचा गुद्दा पोटात बसला आणि साहेबांचा जीव तळमळला. तो गुद्दा त्यांच्या जीवावरच बेतला असता. पण,  त्यातून ते सहिसलामत बाहेर पडले. पण इमेज काही सोडली नाही. कारण सिनेमात हाणामारीतून हिरोने व्हीलनला गारद करणारा सीन पाहायला लोक गर्दी करीत होते. ॲक्शन सीन्स ही कालांतराने चित्रपटाची आत्यंतिक गरज झाली. त्यामुळे ॲक्शन सीन्ससाठी आधुनिक तंत्रांचा वापर चित्रपटात जास्त होऊ लागला. फाईट मास्टर आणि साहसी दृश्य करणारी मंडळीची चांगलीच चलती झाली. मागणी वाढू लागली तशी फाईट मास्टर्सनी ॲक्शनसीन मध्ये अधिक कल्पकता आणली. प्रत्येक चित्रपटात विविध पद्धतीने म्हणण्यापेक्षा अधिक साहसी पद्धतीने ॲक्शनसीन्स चित्रीत होऊ लागली. त्या सीन्सचा चित्रपटाच्या प्रसिद्धी-प्रचारातही खुबीने वापर होऊ लागला. हीरोने चालत्या बसवर चढणे, पाठलाग, चालत्या ट्रेनमधील हाणामारी, महाकाय आग किंवा बॉम्बस्फोटातून एखाद्याला वाचविणे, पाण्याखालची हाणामारी वैगरे वैगरे... ह्या अश्या नानाविध क्लृप्त्या लढविण्यासाठी चित्रीकरणाचा तामझामही वाढला. साहजिकच, खर्चही वाढला, चित्रीकरणाला लागणारे दिवसही वाढले. हे सगळं असले तरी, ॲक्शन आणि चित्रपट हे समीकरण अधिक प्रभावशाली अन् खार्चिक बनतच गेले. कारण, आधुनिक तंत्रज्ञानामुळे साहसीदृश्ये चित्रपटगृहात जाऊन पाहणेच संयुक्तिक वाटू लागले. मोठ्या पडद्यावर ॲक्शन पाहणं हा स्वत:ला ट्रीट देण्यासारखेच आहे. त्यामुळे टेलिव्हीजनच्या वाढत्या प्रभावातही ॲक्शनफिल्म्स पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी होते आणि निर्मात्यांना ॲक्शनशिवाय चित्रपट ही संकल्पना न परवडणारी असल्याने पूर्णत:  ॲक्शन्सने भरपूर असलेले ॲक्शनपट देणे गरजेचे वाटते. हॉलिवूड प्रमाणे आपल्याकडेही ॲक्शनस्टार ही कल्पना अधिक जोमाने पुढे आली. त्यात अक्षयकुमार आणि अजय देवगन यांच्या पदार्पणानंतर हिंदीला जणू अरनॉल्ड आणि जॅकीचॅन गवसल्यासारखंच वातावरण निर्माण झालं. आणि त्या दोघांच्या ॲक्शन्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिनेमागृहात गर्दी होऊ लागली. सोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही ॲक्शनची परीणामे बदलू लागली. अतिश्योक्ती हा शब्दप्रयोग पटवून देण्यासाठी तिथल्या ॲक्शनसीनचा दाखला दिला तर वावगे ठरू नये, अशी तिथली ॲक्शन होती. पण त्या सिनेमांचा बोलबोला हिंदी चित्रपटांपेक्षाही सरस होता. ज्या सिनेमांमध्ये अतिरंजीत हाणामारी, साहस त्या सिनेमांचे निर्माते गोणी-गोणीभर पैसे घरी नेऊ लागले. तो ट्रेण्ड आजही कायम आहे. इंग्रजी, हिंदी आणि तेलगु चित्रपटांतील ॲक्शनफिल्म पाहणारा चाहतावर्ग वेगवेगळा असला तरी केवळ ॲक्शनफिल्म्स पाहणारा प्रेक्षकवर्ग हा संख्येने मोठा होत गेला. चित्रपट कोणतही असो, केवळ ॲक्शन पाहणारा प्रेक्षकवर्गही सध्या मोबाईलवर आपली गरज उत्तम पद्धतीने भागवित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ॲक्शनप्रेमी प्रेक्षकवर्ग असुनही मराठी चित्रपटसृष्टीत ॲक्शन बेतानेच असते. कारण, बजेट आणि कलाकारांची ॲक्शनप्रती असलेली अनास्था किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरीक तंदुरुस्तीचा अभाव. त्यामुळे मराठीत एकतर साहसदृश्य विरहीत हाणामारी असते किंवी असलीच तर आटोपशीर पद्धतीने त्याचे चित्रीकरण होते. त्यामुळे खुप मोठा सिनेप्रेक्षक वर्ग मराठी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात नाही. केवळ आशयघन चित्रपट, हे मराठी मागे लागलेले बिरूद तोट्याचे ठरते. आजही शंभरात जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरतात. त्यामुळेच कदाचित मोठ्या संख्येने सिनेरसिक हिंदी चित्रपटच पाहात असावा. पण, सध्या मराठीतही व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून विविध खार्चिक प्रयोग होताना दिसत आहेत. अलिकडेच बकाल नावाच्या चित्रपटाचा टीझर पाहण्यात आला. त्यातील ॲक्शन आणि स्टंट्स हे बॉलिवूडप्रमामे भासत आहेत. चला, त्या निमित्ताने एक मोठा मराठी प्रेक्षकवर्ग सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहील अशी आशा करायला हरकत नाही. -- मयुर अडकर

चित्रपट रसास्वाद , भाषा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.