इत्तेफाक 'ची पन्नाशी !


यश चोप्रा दिग्दर्शित चित्रपटात एकही गाणे नसणे ही आज आश्चर्याची गोष्ट वाटतेय. पण त्यातच त्यांचे कौतुक करायला हवे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाचे सामर्थ्य प्रेमकथेपेक्षा इतर चित्रपटात आहे हे वक्त, इत्तेफाक, दीवार, मशाल आणि लम्हे यातील काही भावपूर्ण दृश्ये देतात.

इत्तेफाक 'ची पन्नाशी !

  काही चित्रपटांची एकाच वेळेस अनेक वैशिष्ट्ये असतात, 'इत्तेफाक ' ( रिलीज ४ ऑक्टोबर १९६९) या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या चित्रपटाचीही अशीच अनेक वैशिष्ट्ये आहेत. काही तर दुर्लक्षित. बी. आर. फिल्मचा बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'कानून '( १९६०)  हा रहस्यरंजक कोर्ट रुम ड्रामा 'गल्ला पेटी'वर यशस्वी ठरल्यावर याच स्वरुपाच्या  सस्पेन्स चित्रपटाची निर्मिती करावीशी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 'इत्तेफाक ' हा तो चित्रपट आहे. ज्या काळात चित्रपटात एकही गाणे नसणे अशी पटकथा पडद्यावर आणण्याची साधी कल्पनाही करता येणार नाही अशा वेळी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील नायिकेची 'नकारात्मक व्यक्तिरेखा ' साकारण्यास   माला सिन्हा आणि साधना यांनी नकार दिला. पण नंदाने होकार दिला. खरं तर बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'गुमराह '    (१९६४) मध्ये माला सिन्हाने पती ( अशोककुमार) आणि पूर्वप्रियकर ( सुनील दत) यांच्याशी असलेल्या नात्यातील अवघड अवस्थेतील भूमिका उत्तम साकारली होती. ती 'इत्तेफाक 'मध्ये भूमिका साकारू शकली असती. असो. अशी 'नक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट जगत , चित्रस्मृती

प्रतिक्रिया

  1. Meenalogale

      2 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे.नंदाने तिच्या सोज्वळ प्रतिमेला छेद देणारी भूमिका छान वठवली होती आणि इफ्तेखारचा पोलीस इंस्पेक्टर पण लक्षांत राहिला.वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.