चित्रस्मृती : अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता?


चित्रस्मृती 

अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता?

चित्रपटाचे जग म्हणजे कधी कोणता आणि का आश्चर्याचा धक्का बसेल ते सांगता येत नाही.... त्यामागची कारणे तद्दन फिल्मी असू शकतात. अमिताभ बच्चनचा 'फरार ' नावाचाही चित्रपट होता हे त्याचे निस्सीम भक्त वगळता फारसे कोणाला माहितच नाही असे लक्षात येते. अनेकांना 'बेनाम ' म्हणजेच 'फरार ' वाटतो. पण तसे नाही. 'फरार ' ( रिलीज २१ नोव्हेंबर १९७५) ला अजिबात यश लाभले नाही त्यामुळे त्याची तशी चर्चाच कधी झाली नाही. या चित्रपटातील अमिताभ आणि शर्मिला टागोर या जोडीवरचे 'मै प्यासा तुम सावन ' हे गाणे लोकप्रिय आहे, संगीत उपग्रह वाहिनीवर ते सतत दाखवले जाते, ( राजेन्द्र कृष्ण यांनी लिहिलेल्या या गाण्याला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आहे)  पण तरीही हा चित्रपट पटकन लक्षात येतच नाही. याचे कारण म्हणजे, या चित्रपटाला समिक्षक व प्रेक्षकांनी त्या काळात पूर्णपणे नाकारले. आणि अशाच अनेक फ्लाॅप्स चित्रपटांकडे सहज दुर्लक्ष करण्याचाच मानवी स्वभाव आहे. हा चित्रपट गुलजार यांनी लिहिला असूनही दुर्लक्षित राहिलाय हे आणखीन एक आश्चर्य. गुलजार यांच्या गीतलेखन, पटकथा आणि संवाद लेखन आणि दिग्दर्शन या प्रत्येक भूमिकेची स्वतंत्र ओळख आहे. कधी त्या भूमिका एकाच चित्रपटात एकत्र दिसल्या. या चित्रपटात त्यांचा लेखक होता, तर दिग्दर्शन शंकर मुखर्जी यांचे होते. तोपर्यंत त्यांचा बराच दिग्दर्शनीय प्रवास होतांना देव आनंद त्यांच्या चित्रपटातील हुकमी हीरो होता. बारीश ( १९५७), प्यार मोहब्बत ( ६६), महल ( ६९), बनारसी बाबू ( ७३) हे या जोडीचे उल्लेखनीय चित्रपट. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. shripad

      5 वर्षांपूर्वी

    एकदा बघायला हवा.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen