(चित्रभाषा... रविवार, १७ नोव्हेंबर २०१९, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर) जो ना करना चाहा, वो भी मुझे करना पडा... राजेश खन्नाचा फोन आला. ‘क्या बेहतरीन गाया हैं यार महमूद’, असं म्हणून पावती दिली. ‘नही यार, कितना बेसुरा गाना हैं ये’, असं महमूद म्हणाला. तेव्हा राजेश खन्ना तातडीनं उत्तरला, ‘अरे, यही बेसुरापन तो इस गाने की खासियत हैं.’ महमूदच्या आवाजातलंच गाणं कायम ठेवावं, असा आग्रह सगळीकडून होऊ लागला, स्वत: आरडीही आग्रही होते. शेवटी घडायचा तो इतिहास घडलाच... ‘आप का भी जवाब नही अशोकजी. जब तक आप को मनचाहा चाइल्ड आर्टिस्ट नही मिलेगा, आप चैन से नही बैठेंगे’... दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी यांच्या या विधानावर दादामुनी अर्थात अशोककुमार फक्त हसले. कित्येक दिवस लोटले, ‘किस्मत’साठी त्यांना त्यांच्या लहानपणीची भूमिका करणारा बालकलाकार मिळत नव्हता. कित्येक मुलं पाहिली, पण ती दादामुनींना पसंत पडत नव्हती. असंच एकदा सकाळी दादामुनी बॉम्बे टॉकीज स्टुडिओबाहेर फिरायला आले. इकडे-तिकडे नजर फिरवली. नऊएक वर्षाचा एक छोकरा तिथं खूपच बदमाशी करीत होता. मर्कटलीला करीत इतरांच्या खोड्या काढत होता. दादामुनींनी जवळपास अर्धा तास त्याचं निरीक्षण केलं. नंतर, स्टुडिओतल्या लोकांना बाहेर बोलवलं. म्हणाले, ‘उसे देखो.’ युनिटही पाहात राहिलं, त्या मुलाचे चाळे पाहून हसू लागलं. थोडावेळ गेल्यावर दादामुनी म्हणाले, ‘उसे अंदर ले लो...’ चांगली कामं करून माणसं यशोशिखरावर पोहोचतात, हेच आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहोत. मात्र, ही मायानगरी आहे. इथं कधी काय ‘क्लिक’ होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्या मुलालाही याची कल्पना नसावी. त्याच्या तर त्या बाललीला होत्या, इतरांना त्रास देणाऱ्या खोड्या होत्या. मात्र, तिथूनच त्याचं नशीब पाल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
manisha.kale
6 वर्षांपूर्वीछान लेख आहे.