या विषयावर खरं तर एक चांगला सिनेमा किंवा सिरीज होऊ शकली असती. पण एक चांगला प्रयत्न म्हणून आणि शेवटच्या जवळपास अर्ध्या तासाच्या प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगासाठी सिनेमा एकदा पडद्यावर पाहण्यासारखा आहे.
पानिपत - ऐतिहासिक दस्तऐवजं
पानिपत हा सिनेमा ऐतिहासिक दस्तऐवजाचं दृश्य स्वरूप म्हणून पाहायला हरकत नाही. भले त्यात काही ऐतिहासिक चुका आहेत, दिग्दर्शकानं बरंच स्वातंत्र्य घेतलंय, मागच्या काळात आलेल्या काही सिनेमांचा त्यावर प्रभाव आहे, पण एकदा का हे लक्षात घेऊन सिनेमा पाहायला सुरुवात केली की सगळं सोपं होतं. हे असं काहीतरी घडलं होतं, ज्याचं दृश्य स्वरूप असं असू शकेल हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. खरं तर सिनेमाची ऊर्जा सुरुवातीपासून खूप खालच्या स्तरावर लागली आहे. अर्जुन कपूरने त्याचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याचं कास्टिंग योग्य नाही हे सारखं जाणवत राहतं. त्याचे पडलेले खांदे त्यात अजून भर घालतात. संजय दत्तही व्यक्तिमत्वामुळे अब्दाली दिसतो पण संवाद ऐकताना कुठल्याही वेळी मुन्नाभाईचे संवाद म्हणू लागेल की काय असं वाटत राहतं. मुळात दोघेही जडत्व आल्यासारखे वाटतात. योद्ध्यांची चपळता, शार्पनेस त्यांच्यात दिसत नाही. याउलट नानासाहेब पेशवे म्हणून मोहनीश बहल व त्यांच्यासोबत विश्वासराव, समशेरबहाद्दूर, शुजाउद्दोला, इब्राहिमखान गारदी, सुरजमल आणि सकिना बेगम म्हणून झीनत अमान यांचं कास्टिंग योग्य झालंय. पार्वतीबाईंसाठी कृती सेनॉनचं कास्टिंग योग्य वाटतं पण तिचाही अभिनय एकसुरी झाला आहे. पद्मिनी कोल्हापुरेंचं गोपिकाबाईंचं पात्र पाताळयंत्री आणि सासू सुनेच्या टिपिकल सिरीयलमधल्या पात्रास ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .