इफ्फी :एक साजरं होणं


सर्वसामान्यांच्या आयुष्यात सिनेमाचे असलेले रंजनात्मक रुप आणि रसिकांच्या मनात सिनेमाचे असलेले कलात्मक रुप, विचारीजणांनी सिनेमातून पाहिलेले, रुजवलेले आणि पोहोचवलेले चळवळीचे रुप. अशा अनेकविध स्वरुपातून सिनेमाकडे पाहता येते. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून देशभर, जगभर सुरु असलेली ‘चांगल्या’ सिनेमासाठीची चळवळ ही देखील याचाच एक भाग.   भारताचा आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव अर्थात इफ्फीची अजून एक (आणि यावेळी तर सुवर्णमहोत्सवी) आवृत्ती सालाबादप्रमाणे यंदाही मांडवी तीरावर साग्रसंगीत पार पडली. गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात स्थिरावलेल्या आणि त्यातही पाच वर्षांपूर्वी त्यावर कायमचे शिक्कामोर्तब झालेल्या फीला आता नाही म्हटला तरी एकप्रकारचा साचेबध्दपणा आलेला आहे. सगळे कसे ठर(व)ल्याप्रमाणे सुरु आहे. या ठरण्या, ठरवण्यामध्ये कोणतीच कल्पकता नसणे आणि दरवर्षी फक्त आवृत्यांचा आकडा आणि वाढत्या सिनेप्रतिनिधींचा आकडा मोजणे इतकेच काम आयोजकांच्यावतीने होताना दिसत आहे. यंदाच्या इफ्फीतही यापेक्षा थोर वेगळे काही घडताना दिसले नाही. ’सिनेमा म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी’ अशी साधी, सरळ आणि सोपी व्याख्या पंडित नेहरूंनी पहिल्या इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी केली होती. सर्वसामान्यांच्या आयुष्यात सिनेमाचे असलेले रंजनात्मक रुप आणि रसिकांच्या मनात सिनेमाचे असलेले कलात्मक रुप, विचारीजणांनी सिनेमातून पाहिलेले, रुजवलेले आणि पोहोचवलेले चळवळीचे रुप. अशा अनेकविध स्वरुपातून सिनेमाकडे पाहता येते. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून देशभर, जगभर सुरु असलेली ‘चांगल्या’ सिनेमासाठीची चळवळ ही देखील याचाच एक भाग. अशावेळी इफ्फीचे महत्व अनन्यसाधारण राहते. सर्वांत प्रमुख कारण म्हणजे इफ्फी हा देशाचा अधिकृत आंतरराष्ट्रीय सिनेमहोत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    सनलकुमार शशीधरनचा ‘सेक्सी दुर्गा आणि रवी जाधव यांचा ‘न्यूड’, प्रदर्शित व्हायलाच हवे होते. स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा गळा घोटणे केव्हाही समर्थनीय नाही. सेक्सी दुर्गा असं सनसनाटी निर्माण करणारे नाव जरी असले तरी सिनेमा पाहिल्याशिवाय त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही.. सनलकुमार शशीधरन सारख्या बहाद्दूर लोकांना आणखी एक विषय सुचवावासा वाटतो.. भारतात बंदी असलेल्या “लज्जा” सारख्या अनेक कादंब-यांवर अप्रतिम सिनेमा बनू शकतात..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen