दुसऱ्या विश्वयुद्धानंतर निरुपयोगी बॉम्ब सुमद्रात विसर्जित केले गेले. त्यांचं पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केला नाही. जपानच्या सैन्याने प्रशांत महासागरात कुठेतरी विसर्जित केलेला बॉम्ब अनेक वर्षांनंतर भारताच्या पूर्वी किनारपट्टीवर आढळून भंगार गोळा करणाऱ्या माणसाच्या जर हाताला लागला तर त्याचं काय होऊ शकतं ? अतकथी, मद्रास, कबाली, काला या सिनेमांतून धुरळा उडवून देणाऱ्या दिग्दर्शक पा.रंजिथचं नीलम प्रोडक्शन्स हे दर सिनेमागणिक महत्त्वाचं प्रोडक्शन हाऊस म्हणून समोर येत चाललंय. पेरियरुम पेरीमल नंतर त्यांची दुसरी निर्मिती असलेला 'इरंदम उलगा पोरीन कैदासी गुंडू' हा सिनेमा उत्कृष्टतेच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल आहे. भंगार उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ही फिल्म अनेक संदेश देते. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर निरुपयोगी बॉम्ब सुमद्रात विसर्जित केले गेले. त्यांचं पुढे काय होऊ शकतं याचा विचारही केला नाही. जपानच्या सैन्याने प्रशांत महासागरात कुठेतरी विसर्जित केलेला बॉम्ब अनेक वर्षांनंतर भारताच्या पूर्वी किनारपट्टीवर आढळून भंगार गोळा करणाऱ्या माणसाच्या जर हाताला लागला तर त्याचं काय होऊ शकतं ? नीलम प्रोडक्शन्सच्या सिनेमात दिसणारं उपेक्षितांचं दैनंदिन जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचं जगणं, त्यांचे उत्सव या गोष्टी सिनेमात अधोरेखित केल्या आहेत. सिनेमात निळ्या रंगाचा मुक्तपणे वापर केलेला आहे. जगण्याचा अविभाज्य भाग होऊन गेल्यासारखं जवळपास प्रत्येक फ्रेममध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात निळा रंग दिसत राहतो. सिनेमात भारतीय समाजातील विविध स्तर आणि त्यांच्या जीवनशैलीतील फरक स्पष्टपणे मांडला आहे. इथे भंगार रूपक म्हणून वापरलं आहे. शोषित वर्गाचं जगणं एक प्रकारे भंगारच आहे असं त्यातून दिसल ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .