नाग/साप/नागिन/नागपंचमी/ एक सपेरा वगैरे वगैरे प्रकारचे अनेक चित्रपट आपल्याकडे चक्क रौप्यमहोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. कोणी या चित्रपटाना भाकडकथा म्हटलं तर कोणी अशा चित्रपटांचे यश म्हणजे भाबडेपण ठरवले. काही असले तरी हे यश नाकारता येत नाही.चित्रस्मृती
'नगिना 'चे रौप्यमहोत्सवी यश.... आपल्याइतके असंख्य गोष्टीवरचे/प्रकारचे चित्रपट जगात कुठेही पडद्यावर येत नसतील आणि इतकेच नव्हे तर प्रेक्षकही कोणता चित्रपट का, कधी, कशाला, केव्हा डोक्यावर घेतील हेही सांगता येत नाही.... नाग/साप/नागिन/नागपंचमी/ एक सपेरा वगैरे वगैरे प्रकारचे अनेक चित्रपट आपल्याकडे चक्क रौप्यमहोत्सवी यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरलेत. कोणी या चित्रपटाना भाकडकथा म्हटलं तर कोणी अशा चित्रपटांचे यश म्हणजे भाबडेपण ठरवले. काही असले तरी हे यश नाकारता येत नाही. आणि तुम्हालाही माहितेय चित्रपटाच्या जगात यशासारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही. सर्व काही त्याचसाठीच तर असते मग तो सापवाला चित्रपट का असेना? हरमेश मल्होत्रा निर्मित आणि दिग्दर्शित 'नगिना ' ( रिलीज नोव्हेंबर १९८६) अगदी तसाच. तोपर्यंत अनेक 'नागपट ' यशस्वी झाले असले तरी हाही तितकाच यशस्वी ठरेल असे वाटले नव्हते. पण जोपर्यंत नवीन चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो संपून पब्लिक रिपोर्ट बाहेर येत नाही तोपर्यंत कोणत्याही चित्रपटाची कुंडली मांडूच नये या मताचा मी आहे. ऋषि कपूर, श्रीदेवी , अमरिश पुरी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट 'मै तेरा दुश्मन... दुश्मन तू मेरा ' या गाण्याच्या लोकप्रियतेवर प्रचंड लोकप्रिय झाला. https://www.youtube.com/watch?v ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitbmunj
6 वर्षांपूर्वीpost too short to expectation.. should have compared with the earlier similar movies.. also should have discussed the memorable glimpses, features etc.
vilasrose
6 वर्षांपूर्वीलेख खूपच छोटा आहे.नगिनापेक्षा त्यापूर्वीचा "नागिन"हा चित्रपटही खूप यशस्वी झाला होता.त्यातील स्टारकास्टही खूप मोठी व वजनदार होती.