अर्धसत्य - व्यवस्थेवरचं परिणामकारक भाष्य


गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला अर्धसत्य हा भारतीय समांतर चळवळीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. आर्ट फिल्म व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकते हे अर्धसत्यने सिद्ध केलं, वास्तव रुपवाणीच्या समांतर चित्रपट विशेषांकात हर्षद सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेला अर्धसत्यवरील हा लेख.

अर्धसत्य

व्यवस्थेवरचं परिणामकारक भाष्य

                                                                                                                                      -हर्षद सहस्त्रबुद्धे ‘अर्धसत्य’गोविंद निहिलानी दिग्दर्शित नितांतसुंदर सिनेमा. श्री.दा.पानवलकर यांच्या ‘सूर्य’ कथेवर आधारित असणारा ‘अर्धसत्य’ म्हणजे १९८० च्या दशकातल्या ढवळून निघालेल्या सामाजिक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रेंची ‘चक्रव्यूह’ ही अत्यंत मार्मिक कविता, वसंत देवांनी लिहिलेले दर्जेदार संवाद, पानवलकरांची कथा, विजय तेंडुलकरलिखित स्वतंत्र व सशक्त पटकथा, उत्तम अभिनय आणि कसदार दिग्दर्शन या अर्धसत्यच्या जमेच्या बाजू. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांची शैली  परस्परांहून भिन्न प्रकारची असते. त्यांचे विषयही वेगळे असतात. या वेगवेगळ्या शैलींचा सुयोग्य मेळ अर्धसत्यमधे साधला गेला. ८० च्या दशकात एकीकडे व्यावसायिक सिनेमांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असताना दुसरीकडे मात्र, कलात्मक चित्रपटांचे विषय आणि एकंदर संरचना यात झपाट्याने बदल होत होते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्धसत्यने कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट यातली दरी कमी केली. कलात्मक चित्रपटांच्या यापूर्वी असणाऱ् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen