fbpx

‘तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे’

विठ्ठलराव विखे पाटलांनी इ.स.१९४९ साली अहमदनगर जिल्हयातील प्रवरा नगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. नंतर  पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचं मोठं जाळंच उभं राहिलं. बघता बघता हे सहकारी साखर कारखाने आर्थिक व राजकीय सत्तेची केंद्र झाली. यातूनच ‘साखर सम्राट’ हा शब्द वापरात आला. पश्चिम महाराष्ट्रात जसे ‘साखर सम्राट’ तसेच गुजराथेत ‘तेल सम्राट’ तर विदर्भात ‘कापूस सम्राट’ निर्माण झाले.  त्या त्या भागातील पारंपरिक पिकाभोवती सहकारी चळवळ उभी राहिली. या सहकारी कारखान्यांमुळे त्या त्या भागाचा आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला. मात्र बघता बघता या सहकारी चळवळीत अपप्रवृत्तीr शिरल्या व मग सुरू झाला पैशाचा व आर्थिक राजकीय सत्तेचा माज आणि नंगा नाच. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवत ‘सामना’या चित्रपटाला सामोरं जावं लागतं.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'रुपवाणी' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'रुपवाणी' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. छान लेख आहे.

Leave a Reply

Close Menu