ऑस्कर्स स्पर्धेतला प्रमुख पुरस्कार ‘पाम ड’ओर’ मिळणं, अशीही बहुधा ही पहिलीच वेळ असावी. सर्वप्रथम या निर्णयाचं स्वागतच व्हायला हवं, कारण पॅरेसाईटची निवड ऑस्करच्या एरवीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे, आणि ती हा केवळ वेगळ्या भाषेतला चित्रपट आहे म्हणून नाही. ऑस्कर आजवर हिंसक, वादग्रस्त आशयाहून दूर रहायचं. त्या दृष्टीनेही पॅरासाईट हा धीट विचार मांडणारा, हिंसेची अपरिहार्यता अधोरेखित करणारा, समाजाचं वास्तव टोकदारपणे समोर ठेवणारा चित्रपट आहे. ऑस्कर्स २०२० - ॲकॅडमीचा नवा अध्याय गणेश मतकरी २०१९ च्या फेब्रुवारीत मी ऑस्कर्सचा विचार करत बसलो होतो. नॉमिनेशन्स माहीत होती. बऱ्याचशा फिल्म्स पाहिलेल्या होत्या. ‘रोमा’, ही अल्फोन्जो क्वारोनची फिल्म परभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा दोन्ही वर्गात नॉमिनेशन मिळवून होती. प्रश्न होता, की यातल्या कोणत्या विभागात ती ऑस्कर पटकवेल. याआधी परभाषिक चित्रपट मुख्य विभागात नॉमिनेट झालेले होते. १९३८ मधेच रेन्वारची ‘द ग्रॅन्ड इल्यूजन’ ही फ्रेंच फिल्म सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत होती, पण तिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार न मिळता, तो फ्रॅंक काप्राच्या ‘ यू कान्ट टेक इट विथ यू’ ला मिळाला. तेव्हा परभाषिक चित्रपट हा विभागच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्यांना तो पुरस्कार मिळणंही शक्य नव्हतं. आज ‘ग्रॅंड इल्यूजन’ जागतिक चित्रपटांमधला महत्वाचा चित्रपट मानला जातो. आणि काप्रा हा मोठा दिग्दर्शक असला, तरी त्या वर्षीचा त्याचा चित्रपट आज फार कोणाच्या लक्षातही नसेल. ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स ॲन्ड सायन्सेसने १९४७ मधे परभाषिक चित्रपटांचा स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मान करायला सुरुवात केली ती विटोरिओ डे सिकाच्या ‘शूशाईन’ पासून आणि प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .