अमेरिकेतील डिसी कॉमिक्सने निर्माण केलेली सुपरमॅन, बॅटमॅन ही काल्पनिक पात्र पडद्यावर जिवंत झाली आणि त्यांच्या मार्गात अडथळे आणणारा खलनायक म्हणून जोकर ही व्यक्तिरेखासुद्धा! क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित डार्क नाईट या चित्रत्रयीमधून जोकरचे खलनायकी रूप प्रेक्षकांनी याआधी पाहिलं आहे. गॉथम शहरात अराजक माजवणारा जोकर व त्यापासून सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणारा बॅटमन यांच्यातील द्वंद्वाचा थरार प्रेक्षकांनी अनुभवलाय. टॉड फिलिप्सचा जोकर या द्वंद्वाच्या आधीची गोष्ट सांगतो. वाकीन फिनिक्सला जोकरच्या भूमिकेसाठी ऑस्कर मिळण अपरिहार्य होत.उद्रेकाच्या उंबरठ्यावर जोकर
-डॉ. संतोष पाठारे तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, एखादा कलावंत त्याच्या कलेचा अविस्मरणीय आविष्कार घडवतो तेव्हा प्रेक्षकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. वाकीन फिनिक्सचा जोकर पाहताना मात्र तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं हादरवून टाकलं अशी आपली अवस्था होऊन जाते. चित्रपट प्रभावी करण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाची असते. पण जोकरच्या यशाचं श्रेय दिग्दर्शक टोड फिलिप्स एवढंच, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक वाकीन फिनिक्स या अभिनेत्याकडे जातं. वॉक इन द लाईन, हर यासारखे चित्रपट आपल्या सक्षम अभिनयाच्या जोरावर तोलणा-या वाकीन फिनिक्सचा जोकर चित्रपट संपल्यानंतर अक्षरशः आपल्या मानगुटीवर बसतो. अमेरिकेतील डिसी कॉमिक्सने निर्माण केलेली सुपरमॅन, बॅटमॅन ही काल्पनिक पात्र पडद्यावर जिवंत झाली आणि त्यांच्या मार्गात अडथळे आणणारा खलनायक म्हणून जोकर ही व्यक्तिरेखासुद्धा! क्रिस्तोफर नोलनच्या बहुचर्चित डार्क नाईट या चित्रत्रयीमधून जोकरचे खलनायकी रूप प्रेक्षकांनी याआधी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
asmitaphadke
11 महिन्यांपूर्वीnice review. I will see it now.
SCK@2020
11 महिन्यांपूर्वीलेख छान आहे, वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढली तसेच 'डोंबिवली फास्ट ' मधील पिचलेल्या नायकाची आठवण आली.
SCK@2020
11 महिन्यांपूर्वीलेख छान आहे, चित्रपट पाहण्याची उत्सुकता हा लेख वाचून वाढली आहे. यानिमित्ताने एक गोष्ट आठवली की 'डोंबिवली फास्ट' चित्रपटातही पिचलेल्या सामान्य माणसाच्या बंडाचे चित्रण केले आहे.