फॉर्मुला नाकारणारा पथेर पांचाली हा पहिला शुद्ध सिनेमा. कान्स महोत्सवात त्याला पारितोषिक मिळाल्याने भारतभर त्याचे नांव झाले. सर्व महानगरात तो दाखवला गेला आणि सिनेमाकडे गांभीर्याने पाहणाऱ्या मूठभर सुशिक्षित वर्गांत चित्रपटही साहित्याप्रमाणे कला आहे याची जाणीव निर्माण झाली. ‘पथेरपांचाली’च्या निर्मितीमागे कलकत्ता फिल्म सोसायटी हा मूळ स्रोत होता, हे लक्षांत येताच बंगालमधे १९५५ नंतर अनेक फिल्म सोसायट्या निर्माण झाल्या आणि ‘प्रेक्षक चळवळ’ देशभर नेण्यासाठी फिल्म सोसायट्यांचे फेडरेशनही कलकत्ता फिल्म सोसायटीच्या पुढाकाराने स्थापन झाले. (वास्तव रुपवाणी अंक ऑक्टोबर-डिसेंबर २०१९)‘समांतर सिनेमा’ फिल्म सोसायटीचे योगदान
-सुधीर नांदगांवकर सामान्य प्रेक्षकाला सिनेमा हा आवडतो किंवा आवडत नाही. हे दोनच प्रकार ठाऊक असतात. त्यामुळे आर्ट सिनेमा, समांतर सिनेमा, व्यावसायिक सिनेमा हे शब्द त्याच्यासमोर कोणी उच्चारले किंवा त्याच्या वाचनांत आले तरी त्याचा अर्थ समजावून घ्यायचा जराही प्रयत्न तो करत नाही. कारण सिनेमा समजावून घेतला पाहिजे. अभ्यासपूर्ण नजरेने त्याकडे पाहिले पाहिजे असे आजही ८० टक्के प्रेक्षकांना वाटत नाही. या ८० टक्क्यांत सुशिक्षित व अशिक्षित असे सर्व येतात. या प्रेक्षकांचा सिनेमा हे दोन घटका करमणुकीचे साधन या पलीकडे सिनेमाशी काही देणे-घेणे नसते. प्रेम प्रकरणाची कथा, कानांना गोड लागणारी गाणी आणि नृत्ये म्हणजे सिनेमा अशी या भाबड्या प्रेक्षकांची भ्रामक समजूत असते. सिनेमाचा जन्म होऊन आता १२५ वर्षे झाली आहेत. भारतीय प्रेक्षकांची ही सिनेमाविषयी भ्रामक समजूत का झाली कधी झाली आणि कशी झाली. यावर सिनेवि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीसुंदर माहीतीपूर्ण लेख.