१९१७: मानवी संवेदनांची प्रगल्भ अनुभूती


युद्धातल्या घटनांमध्ये लक्षणीय स्वरूपात असणारा आणि प्रकर्षानं न-जाणवणारा घटक, म्हणजे मानवी भावभावना. सॅम मँडिस दिग्दर्शित ‘१९१७’ हा नवा युद्धपट, मानवी भावभावना ठळकपणे दर्शवणारी, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी एक छोटीशी गोष्ट सांगतो.(वास्तवरुपवाणी-  जाने-मार्च २०२०)

१९१७: मानवी संवेदनांची प्रगल्भ अनुभूती

-हर्षद सहस्रबुद्धे जेव्हा एखादं युद्ध होतं, तेव्हा ते असंख्य घटना सोबत घेऊन येतं आणि अनंत आठवणी, व्रण मागे ठेवून जातं. युद्धात मुख्य घटना काय घडल्या, हे तर महत्त्वाचं असतंच; कारण युद्ध घडून गेल्यानंतर पुढची दिशा ठरते. आजूबाजूच्या भौगोलिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडतात. पण, युद्धात घडणा-या मुख्य घटनांइतकंच महत्त्व, युद्धाच्या दरम्यान,आधी आणि नंतर घडणा-या उपघटनांनादेखील असतं. किंबहुना, युद्धात घडून गेलेल्या मुख्य घटनांची कारणमीमांसा, या उपघटना अथवा कहाण्यांवरुन ध्यानात येण्याची शक्यता असते. एखाद्या मोठ्या, जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणा-या युद्धावर आधारलेले असंख्य चांगले चित्रपट आहेत. युद्धात घडलेल्या मुख्य घटना, त्यांचा क्रम आणि घडलेल्या गोष्टींची बिनचूक नोंद, जसाच्या तसा, अस्सल अनुभव देणारं चित्रण, या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच; पण, युद्धातल्या घटनांमध्ये लक्षणीय स्वरूपात असणारा आणि प्रकर्षानं न-जाणवणारा घटक, म्हणजे मानवी भावभावना. सॅम मँडिस दिग्दर्शित ‘१९१७’ हा नवा युद्धपट, मानवी भावभावना ठळकपणे दर्शवणारी, पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी असणारी एक छोटीशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट, म्हणजे पहिल्या महायुद्धादरम्यान घडलेल्या एका मुख्य घटनेमागचं उपकथानक आह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen