संस्कृतीला तंत्रज्ञानाची कास


आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याचा वापर हे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. आपल्या हाताला आणि किंबहुना डोक्याला मोबाईल अक्षरश: चिकटला आहे. दर काही मिनिटांनी मोबाईल चेक केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. दिवसातून कित्येक तास शरीराने आणि मनाने आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. अशा वेळी जगभरातील संग्रहालये आणि आर्ट गॅलरी यांच्यापुढे लोकांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.  

संस्कृतीला तंत्रज्ञानाची कास

-प्रकाश मगदूम

मार्क छगाल या जगप्रसिद्ध रशियन चित्रकाराने १९६४ मध्ये पॅरिस येथील प्रसिद्ध नॅशनल ऑपेरामधील छतावर एक भले मोठे म्युरल रंगवले आहे. हजारो लोक जेव्हा त्या ऑपेरामध्ये जातात तेव्हा जवळपास २६०० स्क्वेअर फूट कॅनव्हासवरती रंगवलेली ती कलाकृती पाहून मुग्ध होऊन जातात. पॅरिसमधील अनेक स्थळे तसेच विविध संगीतकार, चित्रकार आणि कलाकार, लोककला यांचा अतिशय कलात्मक वापर हे म्युरल रंगवताना छगालने केला आहे. विविध रंगांची मनसोक्त उधळण यामध्ये दिसते. परंतु या ऑपेरामधील हे छत खूप उंचीवरती आहे त्यामुळे त्यातील सगळेच बारकावे जमिनीवरून पाहताना प्रेक्षकांना समजून येत नाहीत. अशा वेळी जर हे भले मोठे चित्र तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर पाहायला मिळाले तर? तेही अगदी झूम इन करून, त्यातील छोट्या-छोट्या बारकाव्यावर नजर टाकता आली तर? गिगा पिक्सल तंत्रज्ञानामुळे आता हे शक्य झाले आहे. एक बिलीयन पिक्सलचा समावेश असलेल्या कॅमे-याद्वारे स्कॅनिंग करून अगदी छोट्यातल्या छोट्या ठिपक्यांपर्यंत आपण आता अशी चित्रे पाहू शकतो आणि कित्येक वेळा न समजलेल्या किंवा दुर्लक्षित राहिलेल्या अनेक बाबी रसिकांना अनुभ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


NFAI , Archieve , National

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय माहितीपूर्ण लेख !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen