शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद.....
दिग्दर्शक हा चित्रपटाच्या सेटवरचा कर्णधार! अगदी आपल्याच चित्रपटाच्या सेटवर क्रिकेटचे वेड जपण्यातही! गंमतीत ज्यांना 'फन'मोहन देसाई असे म्हटले जाई त्या दिग्दर्शक मनमोहन देसाईंचे क्रिकेट वेड अगदी भन्नाट होते. अगदी अखेरपर्यंत गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहिल्याने ते 'गल्ली क्रिकेट 'पासूनही कधीच दूर गेले नाहीत. जवळपास प्रत्येक रविवारी डाॅ. भडकमकर मार्गावरच्या गिल्डन लेनच्या मैदानात टेनिस चेंडूवर ते मनसोक्त मनमुराद क्रिकेट खेळताना हमखास दिसत. सदैव पांढरे शुभ्र शर्ट पॅन्टमधील त्यांचा वावर क्रिकेटच्या मैदानातही सूट होई. पण तुम्हाला गंमत माहित्येय का? अगदी आजही तुम्ही याच मैदानाबाहेरच्या भिंतीवर मनजींच्या त्या जी. टी. क्रिकेट संघाचा फलक कायम असल्याचे दिसेल. मनजींचे क्रिकेट प्रेम इतक्यावरच कसे थांबेल? आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून ते बोलावत, आपल्या चित्रपटाबाबत माहिती देत. आणि अशातच जर क्रिकेटचा मौसम असेल तर? तर त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर अथवा अगदी सेटबाहेर दूरचित्रवाणी संचाची सोय असणारच. ते अशा वेळी अधूनमधून सामना पाहताहेत की अधूनमधून शूटिंग करताहेत असाच प्रश्न पडावा. बरं, सामना अगदी रंगात असेल तर त्यांच्यासोबत सेटवरचे स्टार, तंत्रज्ञ आणि कामगारही त्यांच्यासोबतच आनंद घेत. ( सोबतचा फोटो त्यांच्याच 'नसिब 'च्या सेटवरचा आहे आणि त्यांच्यासोबत अमिताभही मॅच एन्जाॅय करतोय. ) मनजींना क्रिकेटमधून आनंद आणि उर्जा मिळे. एक प्रकारचे त्यांचे ते टाॅनिकच. आपल्याच चित्रपटाच्या सेटवरचा तणाव हलका करण्यासाठीची ती एक संधीच. मनजी अस्सल फिल्मवाले होते, प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीछान लेख.