संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात. भरभक्कम प्राणी क्षणात सपाट होतात व रेषारूप होतात. रूप बदलून पुन्हा त्रिमिती होतात. भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू नसलेली परीकथांच्यापेक्षाही अद्भुत, साय-फायच्या जगांपलीकडची जगेही अॅनिमेटर निर्माण करतात. मिकी माऊस जसा जगात सर्वत्र प्रवास करू लागला तशीच त्याला जन्म देणारी अॅनिमेशनची कला जगातल्या अनेक देशात नित्यनवीन रूपात, विविध संस्कृतींचे संस्कार व रंगढंग घेत पसरू लागली. राम मोहन हा ह्याच परंपरेतला भारतीय कलावंत होता.अॅनिमेटर
राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९)
-अरुण खोपकर राम मोहन हा भारतातला विसाव्या शतकातला सर्वात प्रतिभावंत अॅनिमेटर होता. अॅनिमेटर या शब्दाच्या व्युत्पत्तीतच चैतन्य सामावले आहे. ‘अॅनिमेशन’च्या मुळाशी असलेला अॅनिमेट किंवा अॅनिमाटुस हा लॅटिन शब्द ‘ज्याला श्वास घेता येतो’ अशाच अस्तित्वाचा निर्देश करण्याकरता वापरला जातो. म्हणूनच अॅनिमेट व इनानिमेट हे शब्द सजीवांना व निर्जीवांना वापरले जातात. अॅनिमेशन करण्याची शक्ती असणारा तो अॅनिमेटर. हा कोणत्याही वस्तूला आपल्या तंत्राने व मंत्राने सजीव करू शकतो. संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात. भरभक्कम प्राणी क्षणात सपाट होतात व रेषारूप होतात. रूप बदलून पुन्हा त्रिमिती होतात. भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू नसलेली परी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .