प्रास्ताविकाऐवजी


अशोक राणे यांच्यासारख्या कार्यकर्तृत्वाच्या, ‘सिनेमा पाहणाऱ्या माणसा’च्या आत्मकथनाला मी प्रास्ताविक ते काय लिहिणार? म्हणून हे लिहितोय....प्रास्ताविकाऐवजी.  

प्रास्ताविकाऐवजी

-प्रा. अभिजित देशपांडे ‘कोहं?’ (मी कोण आहे?) हा प्रश्न तसा सोपा नसतो. त्याला सामाजिक-सांस्कृतिक-तात्त्विक पदर आहेत. आपण कोण आहोत, आपली ओळख काय-‘आपली आयडेंटिटी’ नेमकी काय-हा प्रश्न आणि त्या प्रश्नाची वेगवेगळ्या टप्प्यांवर गवसलेली वा न गवसलेली उत्तरं- हा व्यक्तीच्या अवघ्या असण्याचा गाभा असतो. संवेदनशील-विचारी व्यक्तीचा हा आत्मशोध निरंतर चालू असतो. वयाच्या एका टप्प्यावरून, अनुभवांचा एक विशाल पट पाठीवर घेऊन या असण्याचा शोध घेताना, जगण्याकडे मागे वळून पाहणं असो की, जगण्याकडे एका सुदूर उंचीवरून पाहणं-अशा आत्मशोधाचं लेखनरूप म्हणजे आत्मकथन. ती निव्वळ आठवणींची जंत्री असत नाही. अवघ्या जगण्याचा पसारा मांडून त्याची संगतवार जुळणी करत त्यातून एक कथानक उभं करणं- हेही स्वत:ला रचणंच असतं. हे आत्मरचित म्हणजेही आत्मकथनच. सिनेमा पाहणारा माणूस हे अशोक राणे यांचं आत्मकथन या जातकुळीतलं आहे. अशोक राणे यांचं अवघं जग आणि जगणंच सिनेमाने व्यापलेलं आहे. लहानपणापासून सिनेमा जगण्यात क्रमश: कसा येत गेला, कसा पसरत गेला, सिनेमाने स्व च्या पलीकडचं जग कसं दाखवलं, क्षितिजं कशी विस्तारली, सिनेमाने आंतरदृष्टीच कशी बदलून टाकली.. याची ही चित्रमय गाथा आहे. सुरुवातीच्याच प्रास्ताविकपर परिच्छेदात अशोक राणे थेट या असण्याच्या प्रश्नाला भिडतात. जगण्याचा पसारा काव्यात्म शैलीत एका परिच्छेदात गुंडाळताना जणू काही जगण्याचा ट्रेलर मांडत असल्याच्या थाटात ते म्हणतात: ‘..आरंभी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. purnanand

      2 वर्षांपूर्वी

    छान लेख साधारण १५ वर्षापूर्वी श्री अशोक राणे यांचे एक अगदी छोटेसे सदर रविवारच्या लोकसत्ते [बहुदा] मध्ये येतसे ते आठवले जाताजाता पुस्तकाचे प्रकाशक आणि किमत दिली असती तर बरे झाले असते.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen