चित्रस्मृती


चित्रस्मृती 

सिनेमाच्या पडद्यावर सलिम दुराणी पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड......

सलिम दुराणी असं म्हणताक्षणीच जुन्या पिढीतील  क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर येते ते  स्टेडियममध्ये खच्चून भरलेल्या गर्दीतून झालेली 'व्ही वाॅन्ट सिक्सर 'ची पूर्ण केलेली हुकमी मागणी....त्या काळात कसोटी सामन्यात सिक्स म्हणजे, आजच्या विरार लोकलमध्ये संध्याकाळच्या गर्दीत धक्का न लागता चढायला मिळेल इतके दुर्मिळ ! पण क्रिकेटच्या मैदानाभरची फटकेबाजी आणि सिनेमाच्या पडद्याभरची अदाकारी यात प्रचंड फरक आहे आणि हे अनेक क्रिकेटर हीरोगिरीच्या क्षेत्रात आल्यावर दिसून आले, पण चित्रपट रसिकांनी ते चित्रपट  नाही पाहिले. सलिम दुराणी उंच, धिप्पाड, देखणा, त्यामुळे 'आपण हीरोगिरी ' करु शकतो असा त्याला विश्वास वाटणे स्वाभाविक आहे आणि त्याची अष्टपैलू क्रिकेटपटूची लोकप्रियता बाॅक्स ऑफिसवर कॅश होऊ शकते असे निर्माता आणि दिग्दर्शकाला वाटूही शकते. सिनेमाच्या जगात असे सतत कोणाला ना कोणाला काहीतरी वाटतच हे क्षेत्र भारी विस्तारलेय. त्याबद्दल काही बोलायचे नसते इतकेच. 'अवघ्या काही दिवसांच्या शूटिंग सत्रात.... धाडसी थीमवर चित्रपट घडवणारे दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी सलिम दुराणीला आपल्या 'चरित्र ' ( १९७३) या चित्रपटाच्या हीरोगिरीसाठी साईन केला तेव्हा भारतात  टोनी लुईसच्या नेतृत्वाखाली इंग्लडच्या  क्रिकेट संघाविरुध्द सामने रंग ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.