'सिनेमा पाहिलेला माणूस' या अशोक राणे यांच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या पुस्तकातील एक लेख!२५६ तीर्थक्षेत्र!
-अशोक राणे
...सकाळी सहा वाजता बस पॅरिसला पोचली. त्या दोन मुलींचा निरोप घेतला. त्यांनी माझा पत्ता घेतला. पुढे दोनेक वर्षं ती मुलगी मला अधूनमधून पत्रं पाठवायची. रात्रीच्या प्रवासात तसं काही पाहायचंच नव्हतं. लंडनहून सुटल्यानंतर एक तासाने ब्रिटिश खाडी येते. ती पार करायला बोटीला एक तास लागतो. बोटीच्या तळमजल्यावर बसेस, गाड्या आणि वरच्या डेकवर प्रवासी. प्रथमच असा प्रवास करतानाचा काय तो थरार होता. वरच्या डेकवरून सभोवताली पाहतानाही विलक्षण असं काही वाटलं... पॅरिसच्या बस स्टॅण्डवर मी कुणाची तरी वाट पाहात असल्यासारखा उभा होतो. कुठे कसं जायचं याचा अंदाज घेत होतो. एक माणूस आला. माझ्या हाती एक रंगीत पँफ्लेट देत इंग्रजीत बोलू लागला. त्याच्या हॉटेलवर रूम मिळू शकेल असं सांगू लागला. मी त्याला म्हटलं, की, माझा मित्र घ्यायला येणार आहे.’’ त्याला खात्री असावी, कुणी येणार नाही याची. तो आसपास रेंगाळत राहिला. मी फोन करण्याचं नाटक केलं. यादरम्यान त्याचा अंदाज घेत होतो. त्याच्या हॉटेलच्या रूमचं भाडं परवडणारं होतं. सत्तर फ्रान्क्स . म्हणजे चारशे वीस रुपये. काही वेळाने मी त्याला म्हटलं, ‘‘चल.’’ तो श्रीलंकेचा होता. त्याचं नाव तिलके. मेट्रोने आम्ही बार्बेस रोशेशुआ या स्टेशनवर आलो. बाहेर आलो तर मला दादर टी.टी. ला आल्यासारखं वाटलं. बाजूलाच असलेल्या ‘माईक्स हॉस्टेल’ वर आम्ही आलो. तिथे सुनिल नावाचा मॅनेजर होता. तोही श्रीलंकन. रजिस्टर भरण्याचे सोपस्कार झाल्यावर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .