चित्रस्मृती'मुंबईचा जावई 'ची रिमेक 'पिया का घर '....रिमेक आणि डब या अनेक भाषांतील चित्रपटात होत असलेल्या गोष्टी. काही फसतात, काही जमतात.जमण्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे, मूळ चित्रपटाची थीम अन्य भाषेतील चित्रपटात फिट बसणारी आहे का? नुसतेच आपले एका भाषेत सुपर हिट ठरलेला चित्रपट अन्य भाषेत डब अथवा रिमेक करण्यात काही अर्थ नाही....असाच एक जमलेला रिमेक म्हणजे, राजा ठाकूर दिग्दर्शित 'मुंबईचा जावई ' ( १९७०) वरुन हिंदीत बनलेला बासू चटर्जी दिग्दर्शित 'पिया का घर ' ( रिलीज २५ फेब्रुवारी १९७२).ग्रामीण भागातील एका युवतीचे मुंबई शहरात एका मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब पद्धतीतील घरात सून म्हणून आगमन होते आणि मग तिची होणारी घालमेल/चिडचिड हे या गोष्टीचे मध्यवर्ती सूत्र! जुन्या मुंबईचे हे वास्तव, तो काळ प्रामुख्याने दाटीवाटीनी उभ्या असलेल्या चाळ सिस्टीमचा. बरं काॅमन नळ आणि टाॅयलेट. त्याच्याशी मूळ नागरीक जुळवून घेत, पण ग्रामीण भागात मोकळ्या ढाकळ्या वातावरणात वाढलेली युवती कशी जुळवून घेणार? त्यात पुन्हा छोट्याश्या घरातील सहकुटुंबात तिला पतीचा सहवास लाभत नाही, फारसा संवादही करता येत नाही. त्यामुळे कुचंबणा होतच असते.'मुंबईचा जावई 'ची ही कथा व. पु. काळे यांची आणि त्यावर पटकथा संवाद राम केळकर यांचे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील च ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-04-10 23:12:33