चित्रस्मृती


चित्रस्मृती 

सिनेमा रखडला, नो प्रॉब्लेम!

सिनेमाच्या जगात हमखास यशाची कोणतीही फूटपट्टी/थर्मामीटर/तराजू/कॅम्प्युटर नाही, हा खूपच मोठा 'रिअॅलिटी शो ' आहे.... एकादा चित्रपट काहीना काही कारणास्तव निर्मितीवस्थेत फारच रखडतो, त्याच्या खाणाखुणा अगोदर पोस्टरवर दिसतात, मग पडद्यावरही तेच दिसू लागते, तरीही तो चित्रपट प्रचंड नसले तरी चक्क चांगले यश मिळवतो.... सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या नवलकथा अशा अनेक, त्या काळात स्टारच्या भारी क्रेझवर असे अनेक चित्रपट 'हाऊसफुल्ल गर्दी 'त पाहिले जात. पडदाभर आपला आवडता हीरो आहे एवढं एकच कारण अख्खा सिनेमा पाहण्यासाठी पुरेसे ठरे. राजेश खन्ना त्याचा मोठा लाभार्थी, तर अमिताभ बच्चन त्याहीपेक्षा मोठा फायद्याचा! म्हणूनच तर देवेन वर्मा दिग्दर्शित 'बेशरम ' ( रिलीज  एप्रिल १९७८) केवळ आणि केवळ अमिताभ बच्चनची रुपेरी अदाकारी पाहण्यासाठी पब्लिक आतूर होते. देवेन वर्मा म्हणजे बुध्दिवादी विनोदी अभिनेता म्हणून ओळखला गेला ( तत्पूर्वी तो व्हीलनगिरी करायचा) , निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने 'दाना पानी ' ( त्याच्याच एका चित्रपटाचे नाव) पातळीवरचे चित्रपट घडवले. ( का बरे?) 'बेशरम 'चा मुहूर्त 'दीवार ' ( रिलीज २४ जानेवारी १९७५) च्या यशानंतर अमिताभवर एक दृश्य चित्रीत करुन  झाला आणि 'शोले'( १५ ऑगस्ट १९७५) च्या यशानंतर त्यात अमजद खान आला. दरम्यान, शर्मिला टागोर ( अमिताभची प्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      10 महिन्यांपूर्वी

    इतरांच्या हिट पेक्षा अमिताभचे फ्लॉप जास्त पाहिले जात. पटलं आणि आवडलंवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.