चित्रस्मृती 


चित्रस्मृती 

समिक्षकांनी व्हॅम्पची तारीफ केली......

होय, कधी कधी काही गोष्टी अपवाद ठरतात आणि म्हणूनच तर चित्रपटाच्या जगाबद्दलची उत्सुकता वाढत राहते. अशीच ही गोष्ट आहे, अनेक समिक्षकांनी चक्क खलनायिका अथवा व्हॅम्पचे कौतुक केल्याची! बरं, दिलीपकुमारची दुहेरी भूमिका आहे. त्याची नायिका साकारण्याचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून शर्मिला टागोर आहे ( संपूर्ण सिनेमाभर ती त्याच आनंदात वावरल्याचे सतत जाणवते हे दिलीपकुमारचे यश), चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची पुन्हा वेगळी उजळणी नको. त्यांनी आपलाच यशस्वी चित्रपट 'अफसाना ' (१९५१) ची रिमेक म्हणून हा 'दास्तान ' ( १९७२) पडद्यावर आणला, पण मूळ चित्रपटाला यश लाभले म्हणजे ते रिमेकलाही मिळेलच असे अजिबात नसते. दोन्ही वेळच्या प्रेक्षकांच्या मानसिकता आणि अपेक्षेत फरक असतोच. 'दास्तान 'ला समिक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांनीही नाकारले ( असेही अधूनमधून होत असते, बरं का?) पण अतिशय जहालपणे खलनायिका  साकारलेल्या बिंदूचे भरभरून कौतुक केले. बिंदू म्हणताक्षणीच सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील अतिशय कपटी, बेरकी, धूर्त अशा व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सहज आठवली असेलच. आपल्या एकूणच देहबोलीतून आणि तेही कमी पडतेय असे वाटले तर जहाल जळजळीत कटाक्ष आणि मुद्राभिनय यांची जोड देणार. कटी पतंग, जंजीर, जोशीला इत्यादी चित्रपटात तिच्या वाटेला क्लब डान्सही आला आणि तिने तो आणखीन प्रभावीपणे साकारला. 'दास्तान 'मधील एका दिलीपकुमारची नायिका शर्मिला टागोर तर दुसरा दिलीपकुमार बिंदूचा पती. तिचे नाव माला. ती पतिनिष्ठ अजिबात ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen