पद्मभूषण मारी साटन - विश्वाची नागरिक


भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली.

चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी....

पद्मभूषण मारी साटन;

विश्वाची नागरिक

लेखक : प्रा. सतीश बाहदूर अनुवाद : प्रा. विजय आपटे   भारतातील फिल्म सोसायटी चळवळीचा प्रसार हे मारी सीटन या ब्रिटिश महिलेचे जीवन ध्येय होते. फिल्म सोसायटी चळवळीतून भारतात शुद्ध समांतर सिनेमा निर्माण झाला. सिनेमा संस्कृतीची उभारणी झाली. चित्रपट आस्वादाची शास्त्रशुद्ध पायाभरणी भारतात मारी सीटनने केली. मारीचे शिष्य प्रा. सतीश बहादूर यांच्या आठवणी.... (फिल्म सोसायटी चळवळीची ५० वर्षे या पुस्तकांतून अनुवादित)     ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ या संस्थेच्या ५०व्या वर्धापनदिनी मारी सीटन यांचे कार्य आणि कर्तृत्व यांना उजाळा देणे अत्यंत समयोचित असेच आहे. मारी सीटन ही ब्रिटिश लेखिका आणि समीक्षक! मारी सीटन पहिल्यांदा १९५५ मध्ये भारतात आली आणि तेव्हापासूनच ती आमच्याबरोबर फिल्म सोसायटी चळवळीत अनेक प्रकारे सहभागी झाली. १९८५ मध्ये तिचे निधन झाले. मारी सीटनला व्यक्तिश: ओळखणारे आमच्यातले काही जण आता वयस्क झाले आहेत. मी स्वत: गौतम कौल, एच.एन. नरहरीराव, विजया मुळये, पी.के.नायर आणि गॅस्टन रॉबर्ज मारीची मैत्रीण पामेला कक हिची मला बहुमेल मदत झाली. मारीच्या ट्रस्टची ती आता देखभाल करते. मारी सीटनच्या जीवनातील प्रारंभीच्या दिवसांची माहिती तिच्याकडून मिळाली. मारी सीटन यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून भारतातील सिनेमा संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर त्यांची प्रतिमा उभी करणे या हेतूने हा लेखप्रपंच करीत आहे. शिक्षण मंत्रालयाच्या निमंत्रणानुसार नॅशनल कौन्सिल  ऑफ एज्युकेशनल रीसर्च अ‍ॅण्ड प्रशिक्षण संस्थेला (NCERT)ला प्रौढ साक्षरतेच्या उपक्रमासाठी चित्रपटाचा उपयोग कसा करता येईल याविषयी सल्ला देण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी १९५५ मध्ये मारी सीटन भारतात आल्या. भारताचे ब्रिटनमधील राजदूत व्ही. के. कृष्णमेनन यांनी त्यांची निवड केली. १९४० या दशकात मेनन यांची लंडनमध्ये स्थापन केलेल्या इंडियन लीग या संस्थेशी त्या संलग्न असल्यापासून त्या कृष्णमेनन यांना ओळखत होत्या. शिक्षणातील चित्रपटांच्या दृक् श्राव्य उपयुक्ततेखेरीज आणखी एक गोष्ट मारी सीटन यांनी जोखली होती. चित्रपटाचा माध्यम म्हणून अभ्यास होण्याची, त्याला उत्तेजन देण्याची गरज होती, आणि ही निकड जाणून शिक्षण संस्थांमध्ये आणि शहरांतून फिल्म सोसायटी स्थापन करणे ओघानेच आले. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमधून दिग्गज दिग्दर्शकांच्या म्हणजे इझेस्टाइन  कुरोसावा चॅपलीन अशा अनेक मान्यवरांच्या १६एम.एम. फिल्म्स मारी यांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या. व्याख्याने देत फिल्म्स दाखवत मारी यांनी भारतात ठिकठिकाणी दौरे केले. मुंबई आणि दिल्ली येथे विद्यापीठात फिल्म अ‍ॅप्रीसिएशन चे दोन विस्तृत अभ्यासवर्ग आयोजित केले. ‘फिल्म अ‍ॅज अ‍ॅन एज्युकेशन कोर्स इन इंडिया’ (१९५६NCERT) या पुस्तिकेत त्यांच्या टूरमधील अनुभवाचा जिवंत प्रत्यय येतो. भारतातील विद्यापीठांत फिल्म सोसायटींची स्थापना करण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यांच्या पहिल्याच दौ-यात त्यांनी भेटलेल्या अनेकांशी व्यक्तिगत मैत्री जोडली हे विशेष महत्त्वाचे! इंदिरा गांधी आणि अनेकांशी स्नेह जोडताना चित्रपट प्रेमाचा धागा दुव्यासारखा उपयोगी पडला. इंदिरा गांधी यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे जवाहरलाल नेहरू यांच्याशी जवळचे संबंध आले. याचे फलित म्हणजे ‘पंडितजी:अ पोट्र्रेट ऑफ जवाहरलाल नेहरू’ हे पुस्तक होय. मारी सीटन नेहरूंच्या तीन मूर्ती भवनमधे इंदिरा गांधी समवेतच राहायच्या. १९५५ हे वर्ष ‘पथेर पांचाली’ प्रदर्शित होण्याचे. (हा एक मोठाच योग म्हणायचे) मारी यांनी दिल्लीत मॅटिनी शो पाहिला आणि त्यातील कलागुणांनी प्रभावित झाल्या. त्या कलकत्त्याला सत्यजीत राय यांना भेटायला गेल्या. या त्यांच्या भेटीचे राय यांनी स्वत:च वर्णन केले आहे. त्या दिल्लीहून कलकत्त्याला आल्या, मला भेटल्या आणि म्हणाल्या गरिबीच्या खNयाखुNया वास्तवाचे इतके यथार्थ चित्रण तुम्ही केलेल्या या फिल्मचा केन्द्र सरकारकडे पुरस्कार करण्यास त्या उत्सुक होत्या. फिल्म त्यांना आवडली होतीच. काही मंत्र्यांनी मारी यांनी नेमकेपणाने हेरलेल्या गरिबीच्या मुद्द्याच्या आधारावरच आक्षेप घेतले असल्याचे ऐकिवात असल्याचे मी म्हटले. त्यांनी संबंधित मंत्रालयाला पत्र लिहिले आणि तशी काही संधी आल्यास विदेशातही दाखवण्यास ही फिल्म पूर्णपणे पात्र आहे. असे म्हटले. या पत्रानंतर काही महिन्यानंतर पंडित नेहरूंनी स्वत: ती फिल्म पाहिली. सत्यजीत राय यांच्या शब्दांत, ‘नेहरूही फिल्म पाहून भारावले’. कान्स फिल्म फेस्टिव्हल १९५६ मध्ये ही फिल्म पाठवण्याचा विषय आला तेव्हा नेहरूंनी अत्यंत तत्परतेने चित्रपटाच्या सहभागाला असणारा सर्व विरोध शांत केला. पुढे जाऊन ‘पाथेर पांचाली’ने याच महोत्सवात ‘द बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट’ हा विशेष ज्युरी पुरस्कार मिळवला. तसं पाहिलं तर, मारी सीटन यांची अत्यंत प्रभावी अशी कार्यपद्धती होती. भारतातील नोकरशाहीतील महत्त्वाच्या व्यक्तींशी कशा पद्धतीने व्यवहार करावा याची त्यांच्याजवळ विलक्षण जाण होती. काही वेळा अनवट मार्गांनी संपर्क साधून अत्यंत हुशारीने प्रतिपाद्य विषयावरील महत्त्वाचे मुद्दे पुढे ठेवण्याची किमया त्या साधीत असत. प्रस्तुत उदाहरणातही फिल्मची प्रशंसा करणा-या पत्राबद्दलचा दस्तऐवज येत नाही. कोणातरी अधिका-याकरवी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत पत्रातील मुद्याचा दुवा पोहोचला असावा याची काही गंधवार्ता लागत नाही. ह्या पत्रामुळे बंगालचे मुख्यमंत्री डॉ.बी.सी. रॉय यांना ‘पथेर पांचाली’चा विशेष खेळ पं. नेहरूसाठी आयोजित केला. सत्यजित राय, त्यांची फॅमिली आणि त्यांचे कलात्मक कार्य या सर्वांशी मारी सीटन यांचे सौहार्दाचे संबंध निर्माण झाले आणि त्यातूनच ‘पोट्र्रेट ऑफ अ डायरेक्टर’ सत्यजीत राय हे पुस्तक प्रसिद्धीस आले. (पहिली आवृत्ती १९७१. द पेंग्विन ऑफ इंडिया २००३ आवृत्तीला) संदीप राय याने प्रस्तावना लिहिली आहे, वडील सत्यजित राय त्यांच्यावरील लिहिलेल्या ब-याच चरित्रांवर अपवादानेच त्यांच्या भावना व्यक्त करीत त्याने लिहिले आहे. तरीही मारी सीटन यांनी लिहिलेले पुस्तक हे आदर भावनायुक्त चरित्र असून त्याची शैली रंजक आणि स्नेहल आहे. त्यामुळे या प्रकारच्या साहित्यात ते नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे आहे, असे संदीपला वाटते. परिणामत: तिच्या पहिल्याच भारत भेटीत मारीने तीन अत्यंत भक्कम अझी, परतीच्या कारणांची जणू बेगमी करून ठेवली. त्यामुळे तिला भारतात पुन्हा पुन्हा भेटीचे निमंत्रण मिळत गेले. फिल्म सोसायटी, गांधी नेहरू स्नेहभाव आणि सत्यजीत राय अध्यासन अशी ती तीन कारणे होत. ललितकला या भारताच्या राष्ट्रीय विकासाचा कणा आहेत, असा जवाहरलाल नेहरूंचा ठाम विश्वास होता. म्हणूनच १९५० दशकाच्या सुरुवातीच्या काळात तीन अकादमी स्थापन केल्या. नव्या साहित्यासाठी ‘साहित्य अकादमी,’ कलांसाठी ‘ललित कला अकादमी’ आणि प्रयोगश्रम कलांसाठी ‘संगीत नाटक अकादमी’. १९५० मध्ये चित्रपटासाठी एक चौकशी समिती एस.के.पाटील समिती, नवचित्रपटाने बाळसे धरावे म्हणून धोरणे आखणारी समिती स्थापन केलीr. चित्रपटाचे प्रशिक्षण देणारी फिल्म इन्स्टिट्यूट फिल्म आर्काइव्ह, इत्यादी स्थापन केल्या. चित्रपट वित्त पुरवठा मंडळ सुरू करण्याबाबत पावले उचलण्यासाठी काही सूचना समितीने केल्या. चित्रपट वित्त मंडळाने नवीन चित्रपटांच्या निर्मितीला साहाय्य करावे आणि एकूणच शिक्षणव्यवस्थेत आणि सांस्कृतिक संस्थांत चित्रपट कलेचा अभ्यास होण्यासाठी उत्तेजन द्यावे असा उद्देश समितीच्या सूचनांमागे होता. १९५०च्या दशकात या सर्व सूचना विचाराधीन होत्या. युरोप तसेच जपानमधील नवई सिनेमा आणि पुडोव्हीनसारख्या नामवंत व्यक्ती १९५२ मध्ये भारतात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने इथे आणल्या. सिनेमा या विषयावरील पहिले ‘राष्ट्रीय चर्चा सत्र’, १९५५ मध्ये दिल्लीत आयोजित झाले. हे सारे काही घडत असतानाच सत्यजीत राय यांच्या ‘पथेर पांचाली’चे आगमन झाले आणि त्यांनी अप्पूट्रायॉलॉजी पूर्णही केली. नवीन भारतीय चित्रपटांच्या दृष्टीने उपयुक्त असे बदल-घडत होते आणि त्यातील काहींच्या बाबतीत मारी सीटन यांचा सल्ला नक्कीच घेतला गेला. गौरवर्णाच्या काळे, करडे, कुरळे केशरचना असलेल्या मारी सीटन नेहमीच गडद चश्मे वापरीत. भारतात नेहमीच त्या हॅन्डलूम साडी वापरीत. पायात सोयीच्या कोल्हापुरी चपला. हे नुसतेच अनुकरण नव्हते, तर सहजतेने वावरता यावे या हेतूने (त्या) असा पेहराव करीत असल्याचे त्या मला एकदा म्हणाल्या होत्या. असे राहणे त्यांना आवडत असे. सुती कापडाचा स्पर्श त्यांना सुखद वाटे आणि भारतीय वातावरणात साडी नेसणे त्यांना सोयीचे वाटे. भारतातील वास्तव्याच्या ठिकाणाबद्दल त्या कधी बाऊ करीत नसत. भारतीय पद्धतीच्या घरांमध्ये त्या अगदी सहजपणे राहात असत. अगदी खाणेपिणेसुद्धा. भारतीय पदार्थ आणि त्यातील विविधता उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मसालेदार वगैरे खाद्यपदार्थ भारतीय पद्धतीने त्या हातांनी खात. मारी सीटन यांना धूम्रपानाचे अतिव्यसन होते. एका विनोदी लेखक मित्राने त्यांचे थोडे अतिशयोक्त वर्णन केले : ‘धुराच्या धुक्याआडूनच मेरी शी संवाद साधता येतो!’ याचाच परिणाम म्हणून की काय आयुष्याची अखेरची वर्षे फुफुसाचा आजार जडला. ‘बॉन्कियल न्यूयोनिया’ने त्यांची अखेर झाली. मारी सीटनचा जन्म १९१०चा! तिचे वडील कॅप्टन सीटन ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व्यक्ती होती. त्यांनी भारत आणि आफ्रिका येथे सैन्यात काम केले. लढाईत ते जखमी झाले आणि त्याच जखमांमुळे त्यांचा अंत झाला. तिच्या आईचे नावही मारी होते. सर चार्लस वालपोल यांच्याशी तिचा पुनर्विवाह झाला. स्वत:च्या मुलीला मोकळ्या वातावरणात वाढवण्याची आणि तिची सोयरीक राजघराण्यात करण्याची त्यांची योजना होती. सावत्र वडील आणि आई यांच्या निधनानंतर मात्र मेरी कुटुंबापासून दुरावली आणि रंगभूमीवर नट म्हणून काम करायला घराबाहेर पडली. अभिनय हे काही आपले क्षेत्र नाही हे तिला कळून चुकले आणि ती पत्रकारिता आणि सिनेमाकडे वळली. समाजवादी विचारांच्या प्रभावात ती आली आणि संपूर्ण आयुष्यभर ती समाजवादी राहिली. विचारांशी एकनिष्ठ. अइझेस्टाइन इंग्लंडला १९२९ मध्ये आला आणि नवीन स्थापन झालेल्या ‘लंडन फिल्म सोसायटीने’ ‘द बॅटलशिप प्लेटोमकिन’ दाखवला, सोसायटीने या फिल्मवरील अभ्यासवर्गही आयोजित केला. एझेनस्टाइनला प्रमुख वक्ता नेमले. मेरी ह्या सर्व उपक्रमांच्या आसपास वावरत होतीच. १९३१ मध्ये ती एझेनस्टाइन बरोबर काम करायला सोव्हिएट युनियनला गेली. अनेकांना ते धोक्याचे वाटते आणि तिला मूर्खात काढले. साम्राज्यवादी ब्रिटनला साम्यवादी रशिया अत्यंत धोकादायक शक्ती, अगदी कट्टर शत्रू वाटणे हे स्वाभाविकच होते. परंतु मारी सीटन तिथे जायला सज्ज होती. त्या सर्व अडचणींवर तिने मात केली. ती एझेनस्टाईनच्या निकट राहिली. सोव्हिएट अधिका-यांनी वैचारिक मतभेदांमुळे एझेनस्टाइनला देशाबाहेर जाण्याचे आदेश दिले, तशाही परिस्थितीत अडचणींच्या वेळी त्याला नेटाने साथ दिली. एझेनस्टाइन आपण स्वत: सोव्हिएट कलाकार आणि शिस्तप्रिय नागरिक असल्याच्या मतावर ठाम होता. ‘क्रांतिकारक कलावंताचा एझेनस्टाइन हा स्वतंत्र आवाज होता.’ ह्या सर्व काळात मारी अविरत परिश्रम करून तिच्या पुस्तकासाठी सामग्री जमवीत होती. एझेनस्टाइन-एक चरित्रग्रंथ हे पुस्तक नंतर १९५२ मध्ये प्रसिद्ध झाले. मान्यवर समीक्षक चरित्रवाड्मय प्रकारातील पुस्तकांत या ग्रंथाला फार महत्त्वाचे स्थान देतात. एझेनस्टाइन अमेरिकेला आणि तेथून पुढे मेक्सिकोला त्या देशांतील क्रांतीचा इतिहास सांगणाNया फिल्म निर्मितीसाठी गेला. एझेनस्टाइनने बNयाच भागाचे चित्रीकरण केले पण चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. रशियाला परतणे त्याला भाग पडले आणि चित्रीकरणाची रिळे अमेरिकेत राहिली. मेक्सिकन चित्रपट सामग्रीचा दुरुपयोग झाला आणि नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. एझेनस्टाइन जवळ असलेले फिल्मचे पूâटेज मिळवून सामग्री जमवण्याचा झगडा मेरीला करावा लागला. ‘टाइम इन द सन’ या चित्रपटात तो साकारला (१९४०) ब-याच कालावधीनंतर सोव्हिएट अधिकाNयांना एझेनस्टाइनचे फूटेज सापडले आणि त्यांनी त्यावर ‘क्यू व्हिवा मेक्सिको’ ही फिल्म निर्माण केली. ‘टाइम इन दे सन’ ही फिल्म त्या तुलनेत मूळ निर्मितीच्या खूपच जवळ जाणारी आहे असे त्या विषयातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. रंगभूमी आणि फिल्म या विषयांवर लेखन आणि व्याख्याने या बाबतीत मारी व्यक्त राहिली. ब्रिटनमधील फिल्म सोसायटीची चळवळ वाढवण्याचे काम मेरीने केले. ‘साइट अ‍ॅन्ड साऊंड’हे नियतकालिक, ‘ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट’ आणि ‘ब्रिटिश फिल्म आर्काइव्ह’ या संस्था जम बसवीत होत्या. मेरीने लिहिलेले ब्रिटिश सिनेमावरील (साइट अ‍ॅन्ड साऊंडमध्ये प्रसिद्ध झालेले) पाच लेख त्यांच्यातील सखोल विश्लेषणामुळे वाखाणले गेले. १९३८ मध्ये ‘लंडन टाइम्स’ आणि ‘मॅन्चेस्टर गार्डियन’ या नियतकालिकात लेख मालिका लिहिण्यासाठी मारी अमेरिकेत गेली. कृष्णवर्णीयांना सशक्त करण्यासाठी मारी मानवाधिकार हक्क चळवळीत सक्रिय राहिली. त्या काळात कृष्णवर्णीयांना संरक्षण नव्हते. पॉल रॉबसन या सुप्रसिद्ध कृष्णवर्णीय गायक नटाबरोबर तिची निकटची मैत्री झाली. पॉल राबनसनचा पासपोर्ट परत मिळावा यासाठीच्या प्रदीर्घ संघर्षा नंतर मारीने त्याचे चरित्र प्रसिद्ध केले. पॉल रॉबसनला त्याच वर्षी पासपोर्ट परत मिळाला. १९३८ ते १९४२ या काळात मारीने शिकागो (१९५८) येथील वकील आणि लेखक असलेल्या डोनाल्ड हेसन याच्याबरोबर विवाहित आयुष्य व्यतीत केले. पण हे नाते काही फार टिकले नाही. दुस-या एका स्त्रीचे मन त्याच्यावर जडले होते. तिच्याशी विवाह करता यावा म्हणून मारीने डोनाल्डला विवाहबंधनातून मुक्त केले. स्वत:च्या पतीबरोबर (तो वेगळा झाला असूनही) तिचे सलोख्याचे संबंध होते. एझेनस्टाइनवरील तिचे १९५२ मधील पुस्तक, घटस्फोटानंतर दहा वर्षांच्या कालावधीनंतरही तिने डोनाल्डला अर्पण केले. ज्याच्या शिवाय हे पुस्तक मी लिहू शकले नसते, त्या पतीला हे पुस्तक अर्पण अशी या पुस्तकाला अर्पणपत्रिका आहे. आयुष्यभर तिने स्वत:चे नाव मेरी सेटन हेसन असे (सर्व कायदेशीर व्यवहारात उपयोगी पडावे म्हणून) लावले. फिल्मवरील पद्धतशीर आखलेल्या अभ्यासवर्गासाठी व्याख्यान देणे मारीला विशेषच आवडत असे. काही कालावधीसाठी चालणा-या अभ्यासवर्गात शिक्षक-विद्यार्थी नाते निर्माण होते आणि त्यात विचार करायला, त्यावर मनन-चिंतन करायला, शंकानिरसन होऊन नवी दृष्टी मिळायला साहाय्य होते आणि म्हणूनच हा वर्ग अधिक काळ चालू राहायला हवा होता अशी हुरहुर वर्ग संपताना मनाला लागून राहात असे. मारीला मिळालेला तीन दिवसांचा वेळ तिने ‘बायसिकल थिव्हज’ वरील दोन दिवसांच्या चर्चासत्रासाठी वापरल्याची ‘आग्रा युनिव्हर्सिटी’ती फिल्म क्लबच्या अभ्यासवर्गाची माझी आठवण आहे. जितका खोल विचार करावा तितके त्या कलाकृतीचे नवे पैलू लक्षात येतात असा अभिजात कृतीच्या संदर्भातला अनुभव जाणवतो आणि असेच ‘बायसिकल थिव्हज’च्या चर्चासत्रात घडले. १९६३मध्ये मी ‘फिल्म अ‍ॅप्रिसिएशन’ हा विषय शिकवण्यासाठी ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये आलो आणि १९६७ मध्ये एक महिन्याच्या ‘फिल्म अ‍ॅप्रिसिएशन’या विषयाच्या निवासी अभ्यासवर्गासाठी मारी सीटन यांना प्रमुख शिक्षक म्हणून निमंत्रित केले. या निवासी वर्गात देशभरातून चाळीस विद्यार्थी निवडले गेले. त्याली दोन सदस्य के.वाय.सुबण्णा आणि फादर गॅस्टन रॉबर्ज ही नावे आजही आठवतात. सुबण्णा कर्नाटकातील ‘हेग्गाडू’ या गावातून आले होते. तिथे ते ‘निनासम चित्र समाज’ या नावाची थिएटर शी संलग्न संस्था चालवायचे. ‘कर्नाटक जर्नल’ चित्र संस्कृतीमधील त्यांनी लिहिलेल्या लेखातील उतारा पुढे उद्धृत केला आहे. त्यातील अभिप्राय अगदी बोलका आहे. ‘फिल्म इन्स्टिट्यूट, पुणे’ आयोजित ‘चित्रपट रसास्वाद अभ्यासवर्गात’ ४० विद्याथ्र्यांपैकी मी होतो तेव्हा १९६७ मध्ये मारी सीटन यांना मी पहिल्यांदा पाहिले. सतीश बहादूर अभ्यासक्रम मार्गदर्शक, तर मारी सीटन ‘फिल्म अ‍ॅप्रिसिएशन’ शिकवणा-या अतिथी अध्यापक-प्रमुख शिक्षक होत्या. विश्रांतीच्या वेळातही त्या सिनेमावरील गटचर्चा आयोजित करीत असत. आम्ही सिनेमा या विषयात अठरा तास आकंठ बुडालेले असायचो. आमच्यात त्यांच्या वयाबद्दल नेहमीच चर्चा व्हायची. त्या एकट्या रशियाला, वयाच्या एकविसाव्या वर्षी गेल्या याचा आम्हांला अचंबा वाटला. त्यांचे वय साठीच्या आसपास असावे असा आपला आमचा समज झाला. चित्रपटातील काही दृश्यमालिका दाखविताना वर्गात त्यांचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या भावना उचंबळून येत असल्याचे मला अजूनही आठवते. काही वेळा तर त्यांच्या तोंडून चीत्कारही बाहेर पडत असे. त्या आम्हाला नुसते शिकवीत नसत तर जीवनातल्या ध्येयाची ओळख करून देण्याचा अत्यंत सच्चा प्रयत्न त्या करीत होत्या हे मला आता चांगलेच उमगते आहे. जागतिक सिनेमांतील या अभिजात कृती लोकांपर्यंत आणि विशेष करून माझ्या गावक-यांना दाखवल्या पाहिजेत याची जाणीव मला त्यातूनच झाली. ह्या प्रेरणेने मी ‘हेग्गाडू’ला परतलो आणि गावातील चित्रपटगृहात ग्रामस्थांसाठी अभिजात चित्रपट लावू लागलो. आम्ही गावात ‘फिल्म अ‍ॅप्रिसिएशन’चे वर्गही भरवू लागलो. ‘बॅटलशिप पोटोमकिन’ वर कन्नड भाषेत जेव्हा मी पुस्तक लिहिले ‘चलनचित्रांद माहानुके’ या नावाचे, तेव्हा मी ते मारी सीटन यांना अर्पण केले. पुस्तकाची प्रत पाठवून एकदा ‘हेग्गाडू’ला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी आनंदाने निमंत्रण स्वीकारले आणि एक दिवस ‘हेग्गोडू’  ग्रामस्थांसमवेत घालवला. ओघानेच या सर्व घटनाक्रमाचे तीन परिणाम घडले. पहिला - पुणे येथे फिल्म एप्रिसियेशनचा एक महिना अवधीचा अभ्यासवर्ग १९६७ मध्ये सुरू झाला. त्यानंतर ते एक दरवर्षीचे नियमित वैशिष्ट्य राहिले आहे. ‘फिल्म अ‍ॅन्ड टीव्ही इन्स्टिट्यूट’ आणि ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया’ या दोन संस्था संयुक्तपणे हा वर्ग आयोजित करतात. दुसरा-दसरा दिवाळी सुट्टीच्या काळात के.व्ही.सुबण्णा यांनी स्वत:च्या पुणे अभ्यासवर्गाचा पाठपुरावा करण्यासाठी ‘हेग्गॉडू’ येथे कर्नाटकातील सभासदांसाठी १० दिवसांचा वर्ग चालवला. १९७१-८० या दहावर्षांत सतीश बहादूर यांनी वार्षिक अभ्यासवर्गात सलग अध्यापन केले. आता हा अभ्यासवर्ग व्यापक सांस्कृतिक संदर्भ घेऊन आयोजित होतो. अभिजात चित्रपटांच्या प्रिंट दीर्घ मुदतीसाठी वापरायला मिळाल्यामुळे ‘आर्काइव्ह’च्या सौजन्याने कर्नाटकात सर्वदूर अभिजात चित्रपट दाखवता आले. १९९१मध्ये सुबण्णा यांना ‘मॅगासेसे’पुरस्कार मिळाला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार १९९४ आणि पद्मश्री २००४ मध्ये! २००५ मध्ये ते निवर्तले. फादर गॅस्टन रॉबर्ज हे फ्रेंच कॅनडियन (जेझुइट) धर्मप्रसारक कलकत्ता येथे १९६१पासून राहात होते. सेंट झेवियर्समध्ये ते शिकवतात. फिल्म आणि कम्युनिकेशन या विषयांवर त्यांनी विविधांगी पुस्तके लिहिली आहेत. १९६७च्या चित्रपट रसास्वाद वर्गात त्यांनी भाग घेतला. एझेस्टाइनच्या ‘इव्हानद टेरिबल’ हा चित्रपट वर्गात दाखवला होता. त्यावर मारी सीटन यांच्याबरोबर त्यांनी सखोल चर्चा केली. ‘एझेस्टाइन्स इव्हान द टेरिबल-अ‍ॅन अ‍ॅनॅलिसिस (चित्रवानी,१९८०)’ या पुस्तकात त्यांनी ही चर्चा विस्ताराने मांडली. मारी सीटन यांनी मला माझ्या जीवनात महत्त्वाचे निर्णय घ्यायला कशी मदत केली ते समजून घ्यायला हवे. आग्रा येथे १३ वर्षांचे पदव्युत्तर अध्यापन पूर्ण करून मी विद्यापीठाच्या कामकाजात समाधानी होतो. ‘फिल्म एप्रिसिएशन’ हा विषय शिकविण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यास मी फारसा उत्सुक नव्हतो. ते आव्हान स्वीकारण्यासाठी मारी सीटन यांनी मला प्रवृत्त केले. मळलेल्या वाटेचा, लोकप्रिय रंजक फिल्मच्या वातावरणाचा पगडा जनमानसावर असताना फिल्म तयार करू पाहणा-या विद्याथ्र्यांना चित्रपट कला शिकवणे हे एक खडतर आवाहनच होते. अभिजात फिल्मची घडण अभ्यासताना चित्रपटकलेचे गमक सहजतेने आणि ठामपणे आकलन होईल असे प्रतिपादन मारी सीटन आत्मविश्वासपूर्वक करीत. (‘पोटेमकिन’, ‘बायसिकल थिव्हज’, ‘राशोमन’, ‘साँग ऑफ सिलोन’, बर्ट हान्त्राज ग्लास, नॉर्मन मॅकलेरन्स नेबर्स, सत्यजीत राय यांचे चित्रपट आणि असेच अभिजात चित्रपट) अभिजात चित्रपटांच्या अभ्यासाच्या भक्कम पाठबळावर फिल्म इन्स्टिट्यूटमधील वीस वर्षांचे अध्यापन त्यांनी केले होते. शिक्षण-विस्तार अभ्यासक्रमांतर्गत संपूर्ण देशभर याच पाठबळावर, अगदी इम्फाळ ते राजकोट आणि चंदीगढपासून ते त्रिवेंद्रमपर्यंत अध्यापन केले. माझ्या सर्वच अध्यापनावर मारी सीटन यांच्या पद्धतीची छाप होती. १९३० आणि १९४०च्या दशकांत मारी यांनी स्वत:कडे जमा झालेल्या फिल्म सोसायटी चळवळीच्या ख-या कार्यकत्र्यांचा अनुभव सोबत घेऊन भारतात चळवळ रुजावी यासाठी अविरत प्रयत्न केले. १९४७ मध्ये सत्यजीत राय, चिदानंद दासगुप्ता यांच्यामुळे सुरू झालेली कलकत्ता फिल्म सोसायटी १९५२ मध्ये बंद झाली. १९५६ मध्ये ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारी प्रेरणा मारी यांच्यामुळे मिळाली. विजया मुळ्ये आणि वासी ह्या शिक्षण मंत्रालयातील व्यक्तींबरोबर झालेली बैठक ‘दिल्ली फिल्म सोसायटी’ स्थापन व्हायला उपकारक ठरली. ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी’ज १९५९ मध्ये स्थापन झाल्यावर मारी तिच्या तांत्रिक सल्लागार नेमल्या गेल्या. १९६१ मध्ये इंडियन फिल्म कल्चर हे फेडरेशनचे नियतकालिक सुरू झाले. चिदानंद दासगुप्ता संपादक होते तर मारी सीटन संपादक मंडळावर होत्या. ह्या काळापर्यंत ‘फिल्म एप्रिसिएशन’ या विषयाला अध्यापनयोग्य असे निश्चित स्वरूप आलेले नव्हते. विषयव्याप्ती निश्चिती होणे आवश्यक होते. भारतातील शिक्षणसंस्थांत अभ्यासक्रम पूरक विषय सुरू झाले असले तरी एखाद्या तज्ज्ञाने त्या विषयाची निश्चित अशी दृष्टी देणे याची नितांत गरज होती. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर मारी सीटन यांनी दोन अमूल्य संदर्भांचे योग्य दस्तऐवज सिद्ध केले. चित्रपटकला आणि चित्रपट रसास्वादाची मूलतत्त्वे १. आर्ट ऑफ फाइव्ह डायरेक्टर्स आणि २. फिल्म अ‍ॅन आर्ट अ‍ॅण्ड फिल्म एप्रिसिएशन ‘नॅशनल काउन्सिल ऑफ द एज्युकेशनल रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग’ने ही दोन पुस्तके प्रसिद्ध केली. ख्यातनाम दिग्दर्शकांची व्यक्तिश: ओळख असल्याने जसे एझेनस्टाइन, पुदोव्हकिन, जॉन रेन्वॉ, सत्यजीत राय, अकिरा कुरोस्तावा आणि इतरही मान्यवर आणि त्याच्या जोडीला सिनेमाच्या जन्मापासूनचा इतिहास जवळून पाहिलेला असल्याने मारी यांनी फिल्मचे अत्यंत मनोवेधक विश्लेषण केले. त्यामुळे ‘फिल्म एप्रिसिएशन’चा अर्थ उलगडला आणि फिल्म सोसायटींना चित्रपट रसास्वादाची मार्गदर्शक तत्त्वे मिळाली. पाच दिग्दर्शकांचं काम सेंट्रल फिल्म लायब्ररीत उपलब्ध होते-रॉबर्ट फ्लॅहेटी व्हिटोरियो दिडीसिका, डेव्हिड लीन, सत्यजीत राय आणि एझेवस्टाइन-या लेखकांच्या (दिग्दर्शकांच्या) कृती फिल्म एप्रिसिएशनची तोंडओळख व्हावी या दृष्टीने पाठ्यपुस्तके म्हणून मारी यांनी नमूद केली. त्यांच्या संयत कार्यपद्धतीने फिल्म्स् मिळण्यातील अडचण त्यांनी दूर केली. विविध देशांच्या वकिलातींना तयार करून त्या त्या देशांच्या फिल्मचे विशेष कार्यक्रम भारतात वितरित होतील याकडे त्यांनी पाहिले. त्या नेहमी भारतातील कोणत्याही शहरात जायला तयार असत आणि फिल्म सोसायटीचा कार्यक्रम आणि निवडक खास कार्यक्रमांना हजेरी लावीत. १९६२ मध्ये त्या लखनऊला गेल्या. तिथे त्यांनी अनिल श्रीवास्तव आणि गौतम कौल या दोघांना संघटनेच्या कामाची क्षमता असणारे सभासद म्हणून हेरले. एच.एन.नरहरीराव एक आठवण सांगतात. दक्षिण भारतात विशेष दौरा करून त्यांनी बंगलोरला भेट दिली. जॅपनिझ फिल्म प्रेझेंटेशनसाठी त्या खास आल्या होत्या. सुचित्रा फिल्म सोयाटींचे ते आयोजन होते. ‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ने आयोजित केलेल्या चित्रपट सप्ताहाचे उद्घाटनही त्यांनी केले. ह्या दौ-यात के.व्ही. सुबण्णा च्या ‘हेग्गोडू’ संस्थेलाही त्यांनी भेट दिली. केरळला त्यांनी काही फिल्म सोसायटी कार्यक्रमात भाग घेतला. युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशनने १९६९ या वर्षी ‘युनिव्हर्सिटी फिल्म कौन्सिल’साठी मारी सीटन यांची सल्लागार म्हणून निवड केली. फिल्म सोसायटीजच्या देखभालीसाठी कॉऊन्सिल होती. स्थानिक पुढाकाराने स्थापन झालेल्या फिल्म क्लब्सना १६एम.एम.फिल्म नियोजनबद्ध रीतीने पुरवण्याची ‘यू.एफ.सी.’ची योजना आखली होती. पण काही अपात्र आणि अप्रामाणिक व्यक्ती त्यातील पदे मिळवून त्यात ढवळाढवळ करू लागल्यावर मारी सीटन या योजनेपासून दूर झाल्या. पण भ्रष्ट व्यक्तींना उघडे पाडून त्यांची हकालपट्टी व्हावी यासाठी त्यांनी संघर्ष केला; तरीही व्हायचे ते नुकसान झालेच! आणि योजना बारगळली. आज या आठवणी अप्रस्तुत वाटतील, कारण आज अध्र्या शतकानंतर डिव्हीडीवर आणि नेटवर फिल्म सर्वदूर सहज मिळतात. पण फिल्म सोसायटी चळवळ अशी घडली आहे. एका वेळी एकेक उपक्रम करीत! आणि या एकेक उपक्रमात मारी सीटन प्रत्यक्षपणे सहभागी होत आल्या आहेत. १९८० मध्ये त्यांनी ‘साँग ऑफ द अ‍ॅटम’ही कादंबरी लिहिली. कृष्णमेनन यांचे चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी सामग्री गोळा करण्यासाठी खरेखुरे प्रयत्न केले. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे समग्र चरित्र लिहिण्यासाठी एकाग्र चित्ताने संशोधन शक्य झाले नाही. १९८० दशकाच्या प्रारंभीच त्यांची प्रकृती खालावू लागली. अ‍ॅटेनबर्ग यांच्या ‘गांधी’या निर्मितीशी तरीही त्यांचा खास संबंध होता. बेन विंâग्जले यांची निवड गांधीच्या भूमिकेसाठी झाली ती मारी सीटन यांच्या सल्ल्यामुळे! ‘गांधी’ चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी त्या १९८०-८१ मध्ये त्या भारतात आल्या. मारी सीटन यांना १९८४ मध्ये पद्मभूषण सन्मान मिळाला. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे दफन करण्यात आले. ‘गोल्डर्स ग्रीन दफनभूमी’त त्यांच्या कबरीवर कोरलेली अक्षरे ‘मारी सीटन हेसन पद्मभूषण, अखिल विश्वाची नागरिक!’ अशी आहेत. यातून मारी सीटन यांच्या जीवनाचे सारसर्वस्व व्यक्त होते आणि त्यातली अचूकता मनाला भिडणारी आहे.

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.