चित्रस्मृती


चित्रस्मृती 

मोठा चित्रपट....भला मोठ्ठा मुहूर्त 

       पूर्वीचे आपले फिल्मवाले आपल्या मोठ्या चित्रपटाचा मुहूर्त एकाद्या सार्वजनिक सणासारखा साजरा करीत. कशा कशाची म्हणून कमतरता ती नाही.... ज्योतिषाकडून पंचांग पाहून काढलेल्या शुभ मुहूर्तावर ते कधीच होत नसत, पण त्यात काय तितकंस अशीच जणू भावना असे. मुहूर्ताचे आमंत्रणही छान डिझाइन्स केलेले आणि ग्लाॅसी पेपरवरचे! मुहूर्त स्थळी किती फिल्मवाले, त्यांच्या भेटीगाठी, खरं खोटं हसणं याची गणतीच नाही. कोणतीही गोष्ट मोजून मापून करायची नाही यात हे मुहूर्त कल्चर एकदम फिट.      काही असो. ते शानदार/जोरदार/ग्लॅमरस मुहूर्त बराच काळ लक्षात राहत.     असाच एक मुहूर्त 'रजपूत ' ( रिलीज १६ एप्रिल १९८२) या चित्रपटाचा! चित्रपटाचा दिग्दर्शक विजय आनंद, म्हणजे साधे सुधे प्रकरण नाही. त्याचे अनेक प्रकारची थीम उत्तमरितीने पडद्यावर साकारण्याचे प्रगती पुस्तक वेगळे सांगायला नकोच. या चित्रपटाचे निर्माते मुशीर रियाझ. तेदेखिल मोठे प्रस्थ. त्यांनी कायमच मोठ्या स्टारचे चित्रपट निर्माण केले. दिलीपकुमारची तिहेरी भूमिका असलेला आणि दीर्घकाळ शूटिंग होत राहिलेला 'बैराग ' ( १९७४) त्यांचाच. 'रजपूत 'मध्ये धर्मेंद्र, राजेश खन्ना, हेमा मालिनी, विनोद खन्ना, रंजिता ( हे सगळे मुहूर्ताला हजर), त्याशिवाय  टीना मुनिम, रणजित, रहेमान, इंद्राणी मुखर्जी, ओम शिवपुरी, नासिर हुसेन वगैरे वगैरे. आता एवढी मोठी स्टार कास्ट आणि मुख्य चेहरे 'आपल्याच मूड आणि  वेळे'नुसार सेटवर येणारे. राजेश खन्ना आणि विनोद खन्नाचे याबाबत बरेच किस्से प्रसिद्ध. त्यातले तत्थ अशा मुहूर्ताला अनुभवायला मिळाले.     'रजपूत 'च्या मुहूर्त दृश्याचे दिग्दर्शन शक्ती सामंता यांनी केले ( अशी एक प्रथा होती, पाहुणा दिग्दर्शक नवीन चित्रपटाच्या मुहूर्त दृश्याचे दिग्दर्शन करे) आणि अमिताभ बच्चनच्या शुभ हस्ते मुहूर्त ( तो वक्तशीरपणासाठी ख्यातनाम. पण त्यालाही मुहूर्त उशिरा होऊ शकतो या सिस्टीमशी जुळवून घ्यावं लागले). गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार  लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची दखल महत्वाची. जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये हा जंगी मुहूर्त रंगला.  मुहूर्ताचे दृश्य म्हणजे थीमनुसार एकाद्या जोरदार संवादाचे दृश्य. ते होताच टाळ्या आणि उपस्थितांना हुकमी मोठा गोड्ड पेढा. अगदी दोन घेतलेत तरी चालेल. कारण, हा एक सणच हो. ..... असे असंख्य मुहूर्त होत होत आपल्या चित्रपटसृष्टीचा खूपच मोठा प्रवास सुरू राहिला ( त्यातील 'मजनून ', 'रुद्र ' वगैरे अनेक चित्रपट मुहूर्तालाच बंद पडले तो विषयच वेगळा) ..... असे होता होता असे जंगी मुहूर्त कधी कालबाह्य झाले हे समजलेही नाही. म्हणूनच ते असे आठवतात.... -  दिलीप ठाकूर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.