पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल


जानेवारी २०२० मध्ये पुण्यात आयोजित केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा नारायण अंधारे यांनी घेतलेला आढावा.  

पिफ

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल

-नारायण शिवाजी अंधारे

जानेवारीत पिफ, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमुळे नवीन वर्षाची सुरुवात उत्साहवर्धक होते. मागची सलग चार वर्ष मी या फेस्टिव्हलला उपस्थिती लावतोय. फार सुंदर सिनेमे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेले वेगवेगळे विषय, नवनवीन शक्यतांचा घेतलेला शोध, बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे केलेला वापर यामुळे सिनेमाचा उत्कृष्टतेकडे चाललेला प्रवास दिसतो. या वर्षी अर्जेटिनाच्या ‘द विझल्स टेल’ या सिनेमाने फेस्टिव्हलची ओपनिंग झाली. ‘द सिक्रेट इन हर आईज’ या फिल्मला बेस्ट फॉरेन लँग्वेजचं अकादमी अवॉर्ड मिळाल्यानंतर जुआँ जो कॅम्पानेला हा दिग्दर्शक अर्जेंटिना आणि लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्या फिल्मनंतर तब्बल दहा वर्षांनी त्याने ही फिचर दिग्दर्शित केली आहे. ही फिल्म १९७६ सालच्या ए.मार्टिनेज सॉरेझ दिग्दर्शित ‘येस्टरडेज गायझ युज्ड नो आर्सेनिक’ या फिल्मचा रिमेक आणि त्याच फिल्मला दिलेला ट्रिब्युट आहे. अर्जेंटिनियन सिनेमाचा सुवर्णकाळ गाजवलेली एक अभिनेत्री आता वृद्धापकाळात जगापासून दूर एका मॅन्शनमध्ये व्हीलचेअरवर खिळलेला नवरा, एक स्क्रीनरायटर आणि एक दिग्दर्शक अशा मित्रांसोबत राहते आहे. एके काळी फिल्मी दुनिया गाजवलेले चार त-हेचे चार जण वृद्धापकाळात एकत्र राहत असताना जे खटके उडणं अपेक्षित असतं ते त्यांच्यात होत आहे. पण ए ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen