चित्रस्मृती


चित्रस्मृती 

सिनेमा आठवतोय.... पण दिग्दर्शक?

आपले तरी 'सिनेमाचे जग ' काही विचित्र गोष्टींनी भरलयं आणि म्हणूनच खरं तर कुतूहल वाढतयं.... अशीच एक गोष्ट, अनेक कलाकारांचे  फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन. आणि त्यातही तो चित्रपट लोकप्रिय ठरला, रौप्यमहोत्सवी यश संपादले, तरी पुन्हा त्या कलाकाराने पुन्हा चित्रपट दिग्दर्शन का केले नसावे? येथे एक चित्रपट सुपर हिट ठरल्या ठरल्या निर्मात्यांची लाईन लागते ना? तशा कथा दंतकथा खूप प्रसिद्ध आहेत. असाच एक कलाकार मनमोहन कृष्ण. आजच्या पिढीला या नावाचे कलाकार माहित नसावेत. त्या काळात  चित्रपटात भूमिका साकारत असलेल्याना 'कलाकार ' म्हणत तेव्हाचे ते आहेत. अथवा होते.  ( सत्तरच्या दशकात चित्रपट कलाकारांना 'स्टार ' म्हणायला लागले, आज त्याना 'सेलिब्रेटिज' म्हणतात. हीदेखील प्रगतीच. ) मनमोहन कृष्ण हे खूपच मागील पिढीतील कलाकार आहेत. यश चोप्रा दिग्दर्शित 'धूल का फूल ' ( १९६०) या चित्रपटात  'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा... ' हे गाणे त्यांनी अतिशय प्रभावीपणे साकारले. अब्दुल रशीद ही ती व्यक्तिरेखा होती.  याशिवाय त्यानी नया दौर ( ५७), साधना ( ५८), बीस साल बाद ( ६२), वक्त ( ६५), खानदान ( ६५), उपकार ( ६७), हमराज ( ६७), रामपूर का लक्ष्मण ( ७२), दीवार ( ७५), मेहबूबा ( ७६) अशा असंख्य हिंदी चित्रपटात त्यांनी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. चरित्र भूमिका हे त्यांचे वैशिष्ट्य. आणि अशा अनेक पध्दतीची कार्यशैली/स्वभाव असलेल्या दिग्दर्शकांकडे भूमिका साकारण्याचा दीर्घकालीन  अनुभव असलेल्या मनमोहन कृष्ण यांना चक्क यश चोप्रा यांनी आपल्या यशराज फिल्मच्या बॅनरखाली 'नूरी ' ( रिलीज ११ मे १९७९) चे दिग्दर्शन सोपवले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या तरी यश चोप्रा यांच्यातील निर्मात्यावर काही विश्वास तर हवा की नको? पूनम धिल्लाॅन, फारुख शेख, भरत कपूर, मदन पुरी, इफ्तेखार, गीता सिध्दार्थ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'नूरी ' रसिकांना आवडला. त्याचे श्रेय जा निसार अख्तर आणि नक्ष लायपुरी यांची गीते आणि खय्याम यांच्या संगीतालाही जाते. 'आजा रे आजा रे मेरे दिलबर आजा', 'चोरी चोरी कोई आये' .... या गाण्यातील गोडवा आजही कायम आहे. त्यावेळी मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सरामध्ये खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. पूनम धिल्लाॅन स्टार झाली. फारुख शेखनेही आपल्या गुणवत्तेनुसार चांगली वाटचाल केली. खय्याम तर बरीच वर्षे या चित्रपटाच्या गाण्यांवर खूपच भावूक होत बोलत. एकदा मी देखिल त्यांच्या जुहूच्या घरी हा अनुभव घेतला. पण मनमोहन कृष्ण यांचं काय ? त्यांना अन्य निर्माता जाऊ दे, अगदी यशजीनीही पुन्हा दिग्दर्शनाची संधी दिली नाही.... अभिनय करता करता चित्रपटाचे 'फक्त आणि फक्त ' एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अनेक कलाकार ( स्टार/सेलिब्रेटिज) आहेत. नुसती सूची करायची म्हटलं तरी आठवून आठवून बरीच नावे सांगता येतील. पण काही वेळा अशा चित्रपटाची आठवण येते, गाणेही आठवते, त्या चित्रपटाचे अख्खं व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते. पण सिनेमा लोकप्रिय असूनही दिग्दर्शक आठवत नाही, त्याचे काय? मनमोहन कृष्ण म्हटले की, 'धूल का फूल 'चे गाणे पटकन डोळ्यासमोर येते आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांचे आहे हे देखील लक्षात येते....तेवढे पुरेसे आहे का? दिलीप ठाकूर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.