ब्लॅक मिरर बॅडरस्नॅच


नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा बँडरस्नॅच सध्या चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्यासमोर काही पर्याय येतात. तुम्ही स्क्रीनवर बोटानं स्पर्श करून, समोर आलेल्या पर्यायांपैकी जो योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढच्या घटना अथवा प्रसंग घडतात आणि कथा पुढे सरकते. सिनेमा सुरु झाल्यावर काही वेळाने या समोर येणाऱ्या पर्यायांचं, आपण त्यांची निवड करू शकतो याचं आणि त्यानुसार कथा कशी पुढे सरकते आहे याचं कौतुक वाटतं.  

इट्स ऑल अबाऊट फुलींग अराऊंड!

ब्लॅक मिरर बॅडरस्नॅच

(इंटरॅक्टिव्ह नेटफ्लिक्स फिल्म)

-हर्षद सहस्त्रबुद्धे

नेटफ्लिक्सवर आलेला नवा सिनेमा बँडरस्नॅच सध्या चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्यासमोर काही पर्याय येतात. तुम्ही स्क्रीनवर बोटानं स्पर्श करून, समोर आलेल्या पर्यायांपैकी जो योग्य वाटेल तो पर्याय निवडू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार पुढच्या घटना अथवा प्रसंग घडतात आणि कथा पुढे सरकते. सिनेमा सुरु झाल्यावर काही वेळाने या समोर येणाऱ्या पर्यायांचं, आपण त्यांची निवड करू शकतो याचं आणि त्यानुसार कथा कशी पुढे सरकते आहे याचं कौतुक वाटतं. पण काही काळातच, हे कौतुक ओसरतं आणि आपण सिनेमाच्या कथेकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो. सिनेमाच्या नायकाला, स्टीफनला गेमिंग आणि गेम-प्रोग्रामिंगची आवड आहे. कॉलिन नावाच्या एका गेम डेव्हलपरचा त्याच्यावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. या गेमरने डिझाईन केलेले गेम्स त्याला खेळायला आवडतात आणि तो त्याला मानतो. स् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.