चित्रस्मृती
सेटवरचे प्रकाश मेहरा.....
शूटिंगच्या दिवशी चित्रपटाच्या सेटवर पहिले पाऊल कोणाचे पडायला हवे? दिग्दर्शकाचे! असे एव्हाना तुम्ही उत्तर दिले असेलच. पण प्रकाश मेहरा यात अपवाद होते असे 'जिंदगी एक जुवा ', 'बाल ब्रह्मचारी ' या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी जाणे झाले असता अनुभवले. सकाळी नऊच्या शिफ्टला साडेदहाच्या आसपास कामाला गती येई. साडेबारा वाजेपर्यंत शूटिंग रंगात आलेले असे. आणि तेव्हा प्रकाश मेहरा कडक इस्रीचे पांढरे शुभ्र शर्ट पॅन्ट आणि चकाचक पाॅलीश्ड केलेले बुट अशा रुपात येते. दोन्ही वेळा अगदी असाच अनुभव आला. तोपर्यंत काय? तर त्यांचे सहाय्यक राम सेठी ( तो त्यांच्या अनेक चित्रपटांत दिसतो), सुशील मलिक व्यवस्थित सेट सांभाळत. पण प्रकाश मेहरा एकदा का सेटवर आले की, लक्षात येई की, त्यांचे पेपरवर्क अतिशय पक्के आहे. लंच ब्रेकमधील गप्पांत ते जाणवे. आपण असे अगदी आपल्या पध्दतीने सेटवर येतो याचे त्यांना काहीच गैर वाटत नव्हते हे विशेषच वाटले. प्रकाश मेहरांच्या चित्रपटात डाॅ. श्रीराम लागू, विजू खोटे यांच्याप्रमाणे अनेक महाराष्ट्रीय कलाकारांनी भूमिका साकारलीय. त्यांच्याकडूनही प्रकाश मेहरा यांच्या या शैलीचे कौतुक ऐकायला मिळाले. इतकेच नव्हे तर, आपल्या चित्रपटातील प्रत्येक गाणे अधिकाधिक प्रभावी व्हावे म्हणून ते अशा अनेक गाण्यांसाठी अख्खं एक मोठे शेड्यूल आखत हे समजताच यारी है इनाम मेरा( ज ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .