मृणाल सेन सिनेमाचं एक पर्व


जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक मृणाल सेन  यांच्या कारकीर्दीचा राम तायडे -देशमुख यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा .

मृणाल सेन सिनेमाचं एक पर्व

(१४-५-१९२३ ते ३०-१२-२०१८)

१९८० मध्ये नागपूरच्या सिनेमोंटाज फिल्म सोसायटीत मी प्रथमच मृणाल सेन यांचा ‘एक दिन प्रतिदिन‘ हा चित्रपट पाहिला. समांतर सिनेमाचा सुवर्णकाळ होता तो आणि त्या काळाच्या आठवणीही तशाच सोनेरी आहेत. कलकत्यातल्या मध्यमवर्गीयांच्या चिंता, दुःखं आणि जाणिवांचं अतिशय प्रत्ययकारी चित्रण केलं होतं त्या चित्रपटात. आज जवळ जवळ ४० वर्षांनंतरही त्या चित्रपटाचं प्रत्येक दृश्य माझ्या मनःपटलावर तेवढंच ताजं आहे. असे प्रतिभावंत होते मृणाल सेन. प्रदीर्घ काळ माक्र्सवादाच्या आणि नंतर टागोरांच्या मानवतावादी दृष्टिकोणाच्या मोठ्या प्रभावामुळे बंगाली साहित्यावर आणि चित्रपटांवर या दोन विचारसरणींचे रंग एकत्रितपणे चढलेले दिसून येतात. कालांतराने फिल्म सोसायट्यांमुळे कलात्मक चित्रपटांना प्रोत्साहन मिळू लागले. सत्यजित राय यांनी इटालियन चित्रपटांचा नवयथार्थवाद, जर्मन सिनेमातील अभिव्यक्तिवाद आणि हॉलीवूडची तांत्रिक गुणवत्ता अशा पाश्चिमात्य शैलींचा संमिश्र वापर आपल्या चित्रपटांतून केला. त्यामुळे सिनेमातून व्यक्तीच्या समस्यांचं, आकांक्षांचं चित्रण होऊ लागलं, ते प्रेक्षकांना भावलं. यामुळे एकीकडे वर्ग-संघर्षापुरती मर्यादित राहिलेली माक्र्सवादी विचारसरणी आणि दुसरीकडे व्यक्तिगत सर्जनशीलता यांच्यातलं द्वंद्व समोर आलं. सर्जनशील आणि कलात्मक सिनेमानं आपले पाय घट्ट रोवले, त्याच्या परिणामी मोठ्या संख्येनं प्रतिभावंत चित्रपट-दिग्दर्शक-निर्माते उदयाला येऊ ला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen