चित्रस्मृती


चित्रस्मृती  

मल्टी स्टार कास्ट पोस्टर.....

निर्माता आणि दिग्दर्शक  राजकुमार कोहलींच्या चित्रपटाबाबत नेहमीच मी गंमतीने म्हणतो, त्यांच्या मल्टी स्टार कास्ट चित्रपटातील अनेक चेहरे मोहरे पोस्टरवर जेवढे मोठे तेवढेच  पडद्यावर छोटे. अथवा पोस्टरवर जास्त फूटेज पण पडद्यावर अगदी जेमतेम. खरं तर यश चोप्रा दिग्दर्शित 'वक्त ' ( १९६५) हा आपल्याकडचा पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट असला तरी तो ट्रेण्ड रुजायला चक्क दहा वर्षे लागली. अधे मधे दोन नायकवाले काही चित्रपट आले, पण रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले ' ( १९७५) खणखणीत यशस्वी ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला जणू एकाच चित्रपटात तीन चार अथवा जमलंच तर पाच सहा नायक आणि नायिका यांना एकत्र आणण्याचा परवानाच मिळाला. इतरांचे जाऊ दे, राजकुमार कोहलींच्या अनेक चित्रपटांपैकी फक्त दोन मल्टी/मल्टी स्टार कास्ट चित्रपटाची 'केस स्टडी ' पहा. एक म्हणजे, 'नागिन' ( १९७६) सुनील दत्त, जितेंद्र, विनोद मेहरा, अनिल धवन, फिरोझ खान, संजय खान, कबिर बेदी.... मुमताज, रेखा, रिना राॅय, प्रेमा नारायण, योगिता बाली, नीलम मेहरा वगैरे वगैरे. जेवढे नायक तेवढ्याच नायिका हा नियम आलाच. या चित्रपटात इच्छाधारी नागिण ( रिना राॅय) आपल्या नागरुपी  प्रियकराचा ( जितेंद्र) खातमा केलेल्या एकेकाचा चुन चुन के बदला घेते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर, अमिताभच्या सूडनायकाची ही भाकड आवृत्ती होती.  सिनेमाने रौप्यमहोत्सवी यश संपादले ( मुंबईत नाॅव्हेल्टी  थिएटरमध्ये) आणि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen