काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोकांचं आयुष्य प्रेरणादायी असतं. ते पडद्यावर आणणं यात काही दिग्दर्शकांना आव्हान वाटतं. काही चरित्रपट तर राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. काही चित्रपट तर संबंधित सेलिब्रिटींकडून स्वतःची बाजू मांडण्यासाठी मुद्दाम तयार करवून घेतले जातात. अर्थात हे उघडपणे कुणीच मान्य करत नाही. त्यामुळं चरित्रपटांचा आढावा घेताना चित्रकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपण प्रेक्षक म्हणून कुठल्या परिप्रेक्ष्यातून या सगळ्याकडे बघतो हेही महत्त्वाचं ठरतं.व्यक्ती, चरित्र आणि पट
-श्रीपाद ब्रह्मे सध्या आपल्याकडे धडाधड चरित्रपट येत आहेत. मराठीतही व हिंदीतही! गेल्या काही वर्षांत तर हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेलं दिसतं. सध्या पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चरित्रपटावरून बराच वादंग माजलेला दिसतो. काहींना हा चित्रपट आवडला, तर काहींना अजिबात आवडला नाही. या अनुषंगाने चरित्रपट व आपल्या प्रेक्षकांची मानसिकता यांचा धांडोळा घेणं समयोचित ठरेल. मुळात चरित्रपट का निघतात? आणि कुणाचे निघतात? आपल्या समाजात ज्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्वसामान्य लोकांना कुतूहल आहे, अशा व्यक्तीचं जगणं पडद्यावर आणणं हा अगदी ठळक हेतू सांगता येतो. याखेरीज काही लोकांचं आयुष्य सर्वसामान्य लोकांपेक्षा फारच वेगळं असतं. त्यांच्यात काही तरी असामान्य गोष्ट असते आणि तीविषयी जाणून घ्यायला लोकांना आवडतं. मग अशा व्यक्तींवर चरित्रपट येऊ शकतो. काही लोक ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vilasrose
5 वर्षांपूर्वीलेख खूपच आवडला.ज्यांच्यावर चित्रपट निघाले आहेत,अशा सर्व महान व्यक्तीबाबत लेखामध्ये चांगले विवेचन करण्यात आले आहे.