चित्रस्मृती


चित्रस्मृती

देवदास..... गुलजारचा!

'देवदास' म्हटले की रसिकांच्या खूप जुन्या पिढीला न्यू थिएटर्सचा प्रशमेशचंद्र बारुआ दिग्दर्शित आणि के. एल. सैगलने आपल्या अभिनय आणि गायकी यांनी रंगवलेला  चित्रपट पटकन आठवतो. १९३५ सालचा हा चित्रपट आहे. शरदश्चंद्र चॅटर्जी यांच्या 'देवदास ' या बंगाली कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. हे चांगले माध्यमांतर होते.  त्याचीच बिमल रॉय यांनी दिलीपकुमारला  तीच भूमिका देत रिमेक साकारली. १९५६ साली हा चित्रपट आला तेव्हा दिलीपकुमारची ट्रॅजेडी किंग अशी प्रतिमा लोकप्रिय होती. आणि वैफल्यग्रस्त प्रेमिक दारुच्या आहारी जातो अशा त्याच्या भूमिका रसिकांना आवडत. ( उदा. अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'दाग ', १९५२). रसिकांच्या एका पिढीला 'देवदास ' म्हटले की शाहरूख खान आठवतो. काहीना तो आठवल्याबरोबरच विसरुन जावा असाही वाटतो. याचे कारण म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने तो झगमगाटी केला. त्यातला दर्द हरवला होता. पडद्यावर 'देवदास ' न दिसता पडदाभर 'शाहरूख खान ' दिसला. इतरही काही 'देवदास 'च्या प्रभावातून काही चित्रपट आले आणि गेलेही. एक मात्र पानभर जाहिरात येऊन, मुहूर्त होऊन आणि काही दिवसांचे शूटिंग होऊनही आला नाही. सत्तरच्या दशकातील ही 'न झालेली गोष्ट ' आहे. तो म्हणजे, गुलजार यांचा 'देवदास ' धर्मेंद्र ही व्यक्तिरेखा साकारणार होता. पारो शर्मिला टागोर आणि चंद्रमुखी हेमा मालिनी. चांगली स्टार कास्ट होती. त्या काळात स्क्रीन साप्ताहिकात नवीन चित्रपटाची पान तीनवर पूर्ण पान जाहिरात देता येणे हे फिल्मवाल्याना फार प्रतिष्ठेचे वाटे. तशीच ही आली आणि पटकन डोळ्यात भरली. गुलजार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट जाहीर झाल्याबरोबर    ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत , चित्रस्मृती

प्रतिक्रिया

  1. jspalnitkar

      5 वर्षांपूर्वी

    वा!! ही एकदम नवीन माहिती आहे! आपण एका potentially उत्तम अनुभवाला मुकलो असं वाटतं 😢 गुलझारांचे चित्रपट, त्यांची चित्रपट माध्यमाची हाताळणी, आणि कुठल्याही विषयाकडे वेगळ्याच संवेदनशील दृष्टीने बघण्याची खासियत हा एका (किंवा अनेक!!) वेगळ्या लेखाचा विषय आहे!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen