चित्रस्मृती

चित्रस्मृती

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

 1. ajitpatankar

  हब्बा खातून ही १६ व्या शतकातील काश्मिरी कवियत्री (१५५४ ते १६०९).

  ती एका जमीनदाराची मुलगी. अतिशय सुंदर होती. तिचे नाव मूळ नाव झुन म्हणजे चंद्र. त्या काळात देखील झुन शिकलेली होती. ती अतिशय बुद्धिमान होती, कवी होती. तिचा आवाज अतिशय गोड होता.
  तिला पाहायला आणि तिच्या कविता आणि गाणे ऐकायला बाहेरगावाहून लोकं यायची. यामुळे तिच्या वडिलांनी घाईघाईने तिचे लग्न एका शेतकऱ्याच्या मुलाशी करून दिले.. तो मठ्ठ होता.. त्याला गाणे बजावणे आवडत नसे.. झुन शेतीच्या कामात किंवा घरगुती कामात मदत करत आणि अशी त्याची तक्रार असायची. त्यामुळे ती तिला छळत असे. झुन च्या सुरवातीच्या कविता नवरा आणि सासूच्या मुळे भोगलेल्या हालअपेष्टांवर आहेत.

  यहां कहानी मे twist..
  काश्मीरचा राजा अली शहा चक, याचा मुलगा युसुफ एकदा शिकारीला गेला असता, त्याने झुनचे गाणे ऐकले आणि तो तिच्यावर फिदा झाला. त्याने तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव दिला.. पण तिचे तर लग्न झालेले होते.. प्रकरण राजापर्यंत गेलं. राजाने शेतकऱ्याला झूनला घटस्फोट देण्यास सांगितले पण युसुफला तिच्याशी लग्न करण्यास मनाई केली.. मात्र कालांतराने त्यांनी लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव हब्बा खातून झाले. अली शहाच्या पश्चात युसुफ काश्मीरचा राजा झाला. दोघांचा संसार चांगला चालला होता..
  युसुफवर प्रजा नाराज होती.. त्यांनी अकबराकडे युसुफबाबत तक्रारी नोंदविल्या.. अकबर संधीची वाटच बघत होता.

  याआधी बाबर आणि हुमायुनने काश्मीर बळकविण्याचे अनेक प्रयत्न केले. पण चक लोकांनी यशस्वी लढा देत त्यांचे मनसुबे उधळून लावले.

  तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अकबराने युसुफ शहाला चर्चेसाठी, दिल्लीला बोलाविले.यात काहीतरी काळेबेरे आहे अशी हब्बा खातूनला शंका आली. म्हणून युसुफने दिल्लीला जाऊ नये असा तिचा आग्रह होता. तरी देखील युसफ दिल्लीला गेला. तिथे त्याचा विश्वासघात करून, अकबराने त्याला अटक केली आणि बिहारला तुरुंगात ठेवले. तिथेच १५९२ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

  युसुफ दिल्लीला का गेला याची दुसरी कथा देखील आहे..

  राजा झाल्यावर युसुफ त्याच्या अनेक विद्रोही मंत्र्यांवर नाराज होता.. इसवी सन १५८० मध्ये त्याने अकबराकडे मदत मागितली. अकबराने मानसिंगला पाठविले. मानसिंग तिथे पोहोचेपर्यंत युसुफ आणि विद्रोही मंत्री यांच्यात समेट झाला. अकबर नाराज झाला. मग १५८६ मध्ये त्यांनी राजा भगवानदासला काश्मीरवर आक्रमण करण्यास पाठविले.. थोड्या लढाईनंतर त्यांच्यात समेट झाला.. आणि युसुफ अकबराच्या भेटीला गेला. अकबराने समेट अमान्य केला आणि युसुफला कैदेत टाकले. १५९२ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

  हब्बा खातुनला वैराग्य आले. तिने सुफी पंथाचा स्विकार केला. ती तिच्या मुलीसह झेलमच्या किनारी एक झोपडी बांधून त्यात राहू लागली. उर्वरित आयुष्यात तिने अनेक काविता केल्या. १६०९ साली तिचे निधन झाले..

  अशी ही कथा हिंदी सिनेमावाल्यांना दिसली नसेल तरच नवल…

  हब्बा खातून वर सिनेमा बनवायचे तीन प्रयत्न झाले .

  पहिला प्रयत्न १९६३-६४ च्या दरम्यान साली महबूब खानने केला. त्यात सायरा बानू आणि दिलीपकुमार होते. पण मे १९६४ मध्ये मेहबूब खानचे निधन झाले आणि सिनेमा बनला नाही. हा सिनेमा सेट वर गेलाच नाही. गीतकार होते अली सरदार जाफरी आणि संगीत होते नौशाद यांचे.

  दुसरा प्रयत्न १९८० साली बी.आर. चोप्रा च्या दिग्दर्शनाखाली सिनेमा बनणार होता. कलाकार होते संजय खान आणि झीनत अमान. गीतकार अली सरदार जाफरी. संगीतकार नौशाद होते.. तो देखील काही कारणास्तव बनला नाही.

  १९८७-१९८८ मध्ये मुझफ्फर अलीने या कथेवर आधारित, झुनी नावाने सिनेमा बनवायला घेतला. त्यात विनोद खन्ना आणि डिम्पल कपाडिया प्रमुख कलाकार होते. संपूर्ण सिनेमा काश्मीरमध्ये शूट होणार होता आणि विशेष म्हणजे त्यात काश्मीरचे सर्व मोसम चित्रित होणार होते . गीतकार शहरयार आणि खय्याम चे संगीत होते. मुझफ्फर अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होतं. १९८९ पर्यंत अर्धा सिनेमा बनला होता.. पण नंतर काश्मीरमध्ये गडबड सुरु झाली.. पंडितांचे हत्याकांड झाले.. आणि सिनेमा बारगळला

Leave a Reply