‘भाई’पडद्यावरला की मनातला


पु.ल. देशपांडे यांच्या 'भाई' या चित्रपटाची पटकथा लिहिण्याची प्रक्रिया सांगताहेत गणेश मतकरी...

‘भाई’

पडद्यावरला की मनातला

-गणेश मतकरी मला आठवतय तेव्हापासून मी पुल वाचलेलेच होते. त्यामुळे ते नक्की कोणत्या वयात वाचायला सुरुवात केली याचा पत्ताच नाही. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, पुल एक साठवणमधले अनेक लेख, खोगीर भरती, यांची सतत पारायणं सुरु असायची. त्यांच्या पुस्तकातली बरीचशी माझ्या किंवा माझ्या आजोबांच्या (माधव मनोहरांच्या) घरी होतीच, पण काही वेळा वाचनालयातून आणलेलीही आठवतात. या सगळ्यामधून पुलंशी छान मैत्री झाली. त्यांच्या कथाकथनाच्या (त्यांनी फार कथात्म साहित्य लिहिलेलं नाही पण यापेक्षा वेगळा शब्द काय वापरणार?) कॅसेटस ऐकल्या होत्या, टिव्हीवरही ते पाहिलेलं होतं. बाबांनी पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’तसच ‘असा मी असामी’ यांचं नाट्यरुपांतर केलं होतं. त्या निमित्ताने एका नव्या रुपात पुल भेटले. मी पुलंना विनोदी लेखक समजत नाही. मी त्यांना एक उत्तम लेखक समजतो ज्यांना विनोदाची फार चांगली जाण आहे. त्यांचं विनोदी साहित्य अधिक लोकप्रिय आहे. पण  त्यांचे ‘एकशून्य मी’सारख्या संग्रहातले गंभीर लेख, यशस्वी व्यावसायिक नाटकांसोबत त्यांनी केलेलं ‘एक झुंज वाऱ्याशी’सारखं गंभीर नाट्यरुपांतर, हे तर आहेच, पण चाळ किंवा व्यक्तीसारख्या वरवर विनोदी वाटणाऱ्या लेखनातही आपल्याला गंभीर सबटेक्स्ट दिसतो. त्यांच्या लिहिण्यातून आणखीही एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांचं परफॉर्मर असणं. त्यांच्या सर्व प्रकारच्यालेखनात संवादाला महत्व आहे. ते चिंतन करण्यापेक्षा समोरच्याला काही सांगतायत असं त्यातू ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.