चित्रस्मृती


चित्रस्मृती राजेश खन्नाचा फसलेला 'कमबॅक '  

राजेश खन्नाचा फसलेला 'कमबॅक '

'माझे दिवस पुन्हा येतील..... '  सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील इंग्रजी फिल्मी गाॅसिप्स मॅगझिनच्या कव्हरवरचे हे राजेश खन्नाचे पेटंट विधान झाले होते. आणि त्यासह राजेश खन्नाचे प्रत्येक मॅगझिनसाठी स्वतंत्र फोटो सेशन! आजच्या पन्नाशी साठीपार चित्रपट रसिकांना नक्कीच हे आठवत असेल की, राज खोसला दिग्दर्शित 'प्रेम कहानी ' ( १९७५), शक्ती सामंता दिग्दर्शित 'मेहबूबा ' ( १९७६) हे आपल्या हुकमी दिग्दर्शकांचे महत्वाचे चित्रपट रसिकांनी नाकारले आणि राजेश खन्नाची क्रेझ उताराला लागली यावर शिक्कामोर्तब झाले. तरी बरं या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. ( पण गाणी श्रवणीय आहेत, म्हणून सिनेमा आपोआप हिट होतो हा अलिखित नियम येथे अपवाद ठरला) त्या गाण्यानी या चित्रपटांचे आजही अस्तित्व कायम ठेवले आहे ही तेवढी जमेची बाजू. .... आशिक हू बहारो का, प्रेम बंधन, भोला भाला, कर्म, नौकरी ( हा तर ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट आणि जोडीला  राज कपूर), बंडलबाझ ( हा शम्मी कपूर दिग्दर्शित चित्रपट) असे राजेश खन्नाचे अनेक चित्रपट त्या दिवसांत पडद्यावर आले ते जाण्यासाठीच. 'छैला बाबू 'ने ज्युबिली हिट यश मिळवले तरी त्यात तो राजेश खन्नाचा झंझावात नव्हता.... अशातच राजेश खन्नाने आपला एकूणच लूक बदलला, तेव्हाच्या नवीन पिढीतील अभिनेत्रींना आपली नायिका करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटाचा मुहूर्त अतिशय खर्चिक, स्टाईलीश आणि बरेच दिवस मिडियात चर्चेत राहिल असा करणे सुरु केले. ( तरीही दणक्यात मुहूर्त झालेले 'मजनून '',००७' अस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत , चित्रस्मृती

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen