शांबरिक खरोलिका


संजीवनी खेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या चित्रकथी या पुस्तकातील प्रकरण...

शांबरिक खरोलिका

‘शांबरिक खरोलिका’ ह्या नावावरून काही बोध होतो तुम्हांला? नाही नं? मला देखील काही दिवसांपूर्वी काही बोध झाला नव्हता. परंतु हे नाव त्याच्या वैचित्र्यानं चांगलंच लक्षात राहिलं होतं. पण हे नाव एका अद्भुत ऐतिहासिक महत्त्वाच्या ठेव्याचं आहे हे मात्र त्याची हकिकत ऐकतानाच जाणवलं. एकदा सहज म्हणून पटवर्धन पती-पत्नीकडे गप्पा मारायला गेले होतो. त्यांनी आपल्या नातलगांचे व आपले काही फोटो आणि स्लाइडस् आम्हांला दाखवल्या व त्याबद्दल बोलता बोलता ते आम्हांला त्यांच्या वडलांच्या काळातल्या गोष्टी सांगू लागले. त्यांनी काही काचेच्या पट्ट्या आम्हांला आणून दाखवल्या. त्यांवरील अप्रतिम कारागिरी पाहून आम्ही अगदी भारावून गेलो. घरातल्या भिंतीवर टॉर्चने त्यांनी आम्हांला त्या दाखवल्या. आमचे कुतूहल चाळवले गेले. हे सारं काहीतरी वेगळं आहे, अतिमहत्त्वाचं आहे एवढं मात्र नक्की जाणवत होतं. पण ते पाहत असताना जगातल्या पहिल्या ‘फुलफ्लेज्ड सिनेमा’चे अवशेष आपण हाताळत आहोत याची मात्र अजिबात जाणीव नव्हती. मग अधिक माहिती करून घेणं क्रमप्राप्तच होतं. जी माहिती झाली ती पाहता एक अपूर्व कलाठेवा आजवर एका महाराष्ट्रीयन कुटुंबानं जतन केला तो फक्त पूर्वजांची स्मृती म्हणून याचे कौतुक वाटते. पण ज्या सिनेमा जगताची झगमग आज डोळे दिपवत आहे त्याची हा ठेवा म्हणजे सुरुवात होती हे विसरून चालणार नाही. चित्रपटसृष्टीने व इतिहासाने या प्रयत्नांची योग्य ती दखल घेतली पाहिजे हे जाणवले. आज कित्येक वर्षे पटवर्धन कुटुंबात आपल्या आजोबा-पण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत , चित्रस्मृती , चित्रकथी

प्रतिक्रिया

  1. ajitpatankar

      4 वर्षांपूर्वी

    त्या काळात असं काही सुचणे आणि त्याचे नीटनेटके प्रयोग करणे हे कौतुकास्पद आहे... कलेक्टर जॅक्सनच्या हत्येचे निमित्त होऊन हा खेळ बंद पडला हे दुर्दैवी आहे..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen