चित्रस्मृती


चित्रस्मृती
'अमर अकबर अँथनी ' नि मनजींचा फंडा 
              दिग्दर्शक मनमोहन देसाई हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चमत्कार आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'सिम्बॉलीक दृश्य ', एकादा विशिष्ट अँगल वगैरे वगैरे 'प्रभाव ' दाखवला नसेलही पण, सिनेमाच्या  हमखास गर्दीची नस न नस त्यांना सापडली होती. आयुष्यभर गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये राहून रस्त्यावरच्या माणसाचे निरीक्षण आणि 'शूटिंगला सुट्टी असेल त्या रविवारी ' गिल्डन लेनच्या मैदानात टेनिस चेंडूवर मनसोक्त मनमुराद क्रिकेट खेळण्याचा आनंद यातून त्यांना 'काॅमन मॅन ' समजला होता. गिरगावकर असल्याने मराठी छान बोलत, भेटीचे योग येत राहिले.....
        त्यांचा असाच एक महत्त्वाचा चित्रपट 'अमर अकबर अँथनी ' ( १९७८)
      या चित्रपटात त्यांची नेहमीचीच थीम, लाॅस्ट अँड फाऊंड फाॅर्मुला. खलनायकाच्या नीच कृत्याने लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने भेटतात आणि सिनेमा हॅपी एन्ड! फरक इतकाच की ते तीन भाऊ तीन धर्मात वाढतात. त्यामुळे सर्वधर्मसमभाव साध्य केल्याचे समाधान! दरम्यान, मसालेदार मनोरंजक चित्रपटात जे जे आवश्यक ते सगळे घटक. पण नुसती थेरपी माहित असून उपयोग नाही, ते कसे टेस्टी करायचे हे माहीत हवे. मनजीना ते आपल्या चित्रपटाच्या मु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. vilasrose

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला.अमर,अकबर,अँथनी म्हणजे full मनोरंजन!

  2. Vilas15

      5 वर्षांपूर्वी

    jevha mi punashcha chi membership ghetali aahe teva ase lekh ithe nakoch ki jyanchi mala parat membership ghyavi lagel. he purnapane tumachya members la fasavane aahe. ok mi membership gheu shakato jashi punasha chi ghetali aahe.

  3. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    मनमोहन देसाई यांच्या विषयी लिहिताना अमर अकबर अन्थनी मधील ह्या “रक्तदानाच्या” सीन चा उल्लेख हमखास केला जातो.. आणि कौतुकाचा कितीही आव आणला तरी त्यामागील उपहास लपत नाही.. मनमोहन देसाई हे “मसाला” फिल्म बनवायचे आणि एक सार्वकालिक महान दिग्दर्शक म्हणून आपले नाव व्हावे अशी त्यांची इच्छा नव्हती.. बिमल रॉय ग्रेट होते यात शंकाच नाही...... बन्दिनी,परख,सुजाता,मधुमती,बिरज बहू,दो बीघा ज़मीन,परिणीता. एकापेक्षा एक सरस चित्रपट.. प्रत्येक चित्रपटावर चर्चासत्र आयोजित केली जातात... पण सुजाता मधील एक प्रसंगाबाबत कधी चर्चा झाल्याचे आठवत नाही... सुलोचना यांना रक्ताची गरज पडते आणि फक्त नूतनचा रक्तगट जुळतो.. आणि नूतन रक्तदान करते.. हा प्रसंग कुठच्या वैद्यकीय पुस्तकात बघून चित्रित केला आहे, हे मला कधीच कळले नाही... मनमोहन देसाई यांनी निदान रक्ताची बाटली लटकवलेली दाखविली आहे.. असो... मनमोहन देसाई... समजू शकतो ..पण बिमल रॉय? आणि मनमोहन देसाई यांच्या या “रक्तदानाचा” प्रसंग वारंवार अनेक ठिकाणी सांगताना बिमल रॉय यांच्या सुजातामधील सीनचा उल्लेख कधीच आणि कुणी का करत नाही? हे देखील मला कळलेले नाही..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen