रोमा


चित्रपट कथा सांगतो, मनोरंजन करतो, प्रेक्षकांना स्वप्नांच्या जगात सैर करुन आणतो हे जितकं खरं तितकचं चित्रपट एखाद्या काळाचा तुकडा आपल्यापुढे जिवंत करतो हे देखील वास्तव आहे! दिग्दर्शकाची दृष्टी जितकी स्पष्ट, पडद्यावर प्रतिमा तितक्याच अस्सल रुपात उमटतात. अल्फोन्सो क्युरन रोमातून आपल्यासमोर अशा अस्सल प्रतिमांची अखंड मालिका सव्वादोन तास सादर करतो.  

रोमा

-संतोष पाठारे भारतातील सिनेमा दर्दी प्रेक्षकांसाठी ऑक्टोबर नंतरचा काळ अतिशय उत्साहाचा असतो. मुंबईतील मामि महोत्सवानंतर गोव्यातील इफी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्यानंतर लगेचच मुंबईतील आशियाई चित्रपट महोत्सव व पुण्यातील पिफ! या सर्व चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या उत्तम चित्रपटांची चर्चा होत असतानाच ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड झालेल्या जागतिक चित्रपटांची यादी घोषित होते. या यादीतील कोणते चित्रपट पाहिले गेले? कोणता पहायचा राहिला? कोणता चित्रपट ऑस्कर जिंकणार? या चर्चेला उधाण येते. यंदा या चर्चेमध्ये मेक्सिकोच्या अल्फोन्सो क्युरनचा रोमा केन्द्रस्थानी होता. रोमाने याआधीच जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावलीय, अनेक पुरस्कार पटकावलेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रकाशचित्रण व विदेशी चित्रपट असे ऑस्कर पुरस्कार मिळवणारा रोमा या वर्षातला अतिशय सुंदर चित्रपट आहे. चित्रपट कथा सांगतो, मनोरंजन करतो, प्रेक्षकांना स्वप्नांच्या जगात सैर करुन आणतो हे जितकं खरं तितकचं चित्रपट एखाद्या काळाचा तुकडा आपल्यापुढे जिवंत करतो हे देखील वास्तव आहे! दिग्दर्शकाची दृष्टी जितकी स्पष्ट, पडद्यावर प्रतिमा तितक्याच अस्सल रुपात उमटतात. अल्फोन्सो क्युरन रोमातून आपल्यासमोर अशा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      7 महिन्यांपूर्वी

    where does one get to see this movie ?वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.