चित्रस्मृती
राज खोसला दिग्दर्शित 'तिजोरी 'मध्ये देव आनंद..... दिग्दर्शक राज खोसला आणि सदाबहार देव आनंदचे चाहत्यांना एव्हाना नक्कीच प्रश्न पडला असले की, या दिग्दर्शक आणि हीरो जोडीचा हा 'तिजोरी ' चित्रपट कोणता? कधी बरे पडद्यावर आला/गेला ( करियरच्या उत्तरार्धातील देव आनंदचे बरेचसे चित्रपट खुद्द तो सोडून फारसे कोणी सिरियसली घेत नसे. असतो एकेकाचा कशात तरी 'आनंद '). या जोडीने रसिकांच्या एका पिढीला विविध थीम आणि त्यात म्युझिकल हिट असा झक्कास आनंद दिला. त्याचे प्रगती पुस्तक बघा, मिलाप ( १९५४ , बचना जरा यह जमाना है बुरा हे यातीलच गाणे ), सीआयडी ( १९५६, लेके पहेला पहेला प्यार ), सोलवा साल ( १९५८, है अपना दिल तो आवारा), काला पानी ( १९५८, हम बेखूदी मे तुमको, अच्छा जी मै हारी), बम्बई का बाबू ( १९६०, साथी ना कोई मंझिल, दीवाना मस्ताना हुआ दिल) .... एव्हाना या सर्व गाण्यातील देव आनंद कधी एकटा तर कधी त्याच्या नायिकांसोबत डोळ्यासमोर येतोच. श्रवणीय गीत संगीताची तीच खासियत आहे, ती गाणी चित्रपटाची सतत आठवण देतात. त्यात पुन्हा राज खोसला पडद्यावर गाणे खुलवण्यात एक्स्पर्ट. देव आनंद तर गाण्यात जास्त खुलणारा. ही गाणीच जुन्या चित्रपटांना पुढील पिढीतील रसिकांशी जोडतात. साठच्या दशकात विजय आनंदच्या दिग्दर्शनातील देव आनंदची यशस्वी वाटचाल सुरु झाली आणि राज खोसला अन्य हीरोंकडे वळला. त्याच्या दिग्दर्शनात पुन्हा देव आनंद दिसायला १९७३ साल उजाडले. 'शरीफ बदमाश ' नावाच्या या अॅक्शन चित्रपटात हेमा मालिनी नायिका होती. याही चित्रपटातील तेरे सौ दीवाने, नींद चुराके ऑखो मे.... ही ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.