चित्रस्मृती
सिनेमा तर सुपर हिट ठरले....
'मि. नटवरलाल' असे सिनेमाचे नाव घेताच 'परदेसिया यह सच है पिया सब कहते है मैने तुमको दिल दे दिया ' अशा अतिशय भन्नाट प्रेमगीतातील रेखाची प्रेमाची कबुली आणि अमिताभ बच्चनची 'लोगो को कहने दो ' चा ठोसा आठवतो. याच चित्रपटात अमिताभने वाघाशी केलेली मारधाडही आठवते. आणि एकदम आठवते ते 'खून पसिना 'मध्येही असेच अमिताभचे अॅक्शन दृश्य होते हेही आठवते, पण या चित्रपटांचा दिग्दर्शक राकेशकुमारची पटकन आठवण येत नाही. का बरे? दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या प्रमुख सहाय्यक दिग्दर्शकांतील तो एक होता. सुशील मलिक ( त्याने 'इनामदार ' वगैरे चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केले), राम सेठी ( मेहरा यांच्या चित्रपटात छोटी मोठी भूमिकाही करे. 'घुंगरु ' चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचेच) आणि राकेशकुमार असे तिघे मेहरांकडे घडले. प्रकाश मेहरांनीच 'खून पसिना 'च्या वेळी राकेशकुमारला स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची पहिली संधी दिली. अमिताभ, रेखा आणि विनोद खन्ना अशी पहिल्याच चित्रपटात स्टार कास्ट आणि रौप्यमहोत्सवी यश असा योग जुळून आला, तरी हा चित्रपट प्रकाश मेहरांचा म्हणूनच ओळखला जातोय. राकेशकुमारकडे अमिताभ हे हुकमी नाणे होते आणि अन्य निर्मातेही अशा वेळी मिळत जातात. निर्माते टोनीचा 'मि. नटवरलाल' ( १९७९), देवर फिल्मचा 'दो और दो पाच '( १९८०) आणि एच. ए. नडियादवाला यांचा 'याराना ' ( १९८१) आणि मग काही वर्षांनी त्यांच्या 'कौन जीता कौन हारा ' ( १९८७) या चित्रपटात अमिताभने पाहुणा कलाकार म्हणून नृत्य साकारले.... बरं या चित्रपटात इतरही बडे स्टार. दो और दो पाचमध्ये शशी कपूर, हे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
SCK@2020
5 वर्षांपूर्वीखरंच राकेश कुमार हे दुर्लक्षितच राहिले.
vilasrose
5 वर्षांपूर्वीचांगला लेख
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीसिनेमासृष्टी अजब रसायन आहे हेच खरं. राकेशकुमार हे दुर्दैवी आहेत यात शंकाच नाही... मला देखील त्यांचे नाव हा लेख वाचल्यावरच आठवले..