सर्वच गोष्टी सहजसुंदरपणे जुळून आलेला आनंदी गोपाळ चित्रपट मनावर कोरला जातो, तो देत असलेल्या मौलिक भावनिक संस्कारामुळे. स्वप्न बघणे आणि ते तडीस नेणे, यामध्ये जे अंतर आहे, ते पार करण्याची जिद्द-ताकद प्रवाहाविरुद्ध जाऊन संघर्ष केलेले ते ध्येयवादी आनंदी-गोपाळ-जोडपं प्रेक्षकांना सहजपणे देऊन जातं. मराठी राजभाषा दिन नुसताच उत्सवी सोहळ्यांनी साजरा करण्या ऐवजी दर्जेदार ‘आनंदी गोपाळ’ बघून साजरा केला तरच मराठी भाषेचा अभिमान आपण अधिकाराने मिरवू शकू. 

 

भावगर्भ तरी प्रेरकही झालेला -  आनंदी गोपाळ

-नीला उपाध्ये एखाद्या नामवंत ऐतिहासिक व्यक्तीवरील गाजलेल्या साहित्यकृतीचे रूपांतर, रुपेरी पडद्यावरील पूर्ण लांबीच्या चरित्रपटासाठी हे एकीकडे सोयीचे, दर दुसरीकडे अडचणीचेही होऊ शकते! कारण, ते माध्यमांतर करताना शाब्दिक साहित्यकृती ते, किमान शब्दांत अधिकेतर चित्रांतूनच अधिक अभिव्यक्त व्हावे, अशी अपेक्षा बाळगणारे चित्रपटमाध्यम यातील तोल सांभाळणे, ही एक तारेवरची कसरतच ठरू शकते! त्यामुळेच अलीकडच्या काळात गाजलेल्या साहित्यकृतींवर बेतलेले बहुतांश चित्रपट झटपट डब्यातच गेल्याचे पाहायला मिळाले होते... पण झी स्टुडिओने १५ फेब्रुवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला आणलेला ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट सुखद आश्चर्याचा धक्का देऊन गेला. श्री. ज. जोशी लिखित याच नावाची कादंबरी सत्तरच्या दशकात खूप गाजली होती. कारण ती कादंबरी कल्पित कथा सांगणारी नव्हती, तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या महाराष्ट्रातील पुण्यात होऊन गेलेल्या, खोट्या कपोलकल्पित वाटाव्या अशा- पण खऱ्याखुऱ्या हाडामांसाच्या माणसांची ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. vilasrose

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूप खूप आवडला.चित्रपटाचे परीक्षण अतिशय छान केले आहे.मला हा चित्रपट खूपच आवडला.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen