चित्रस्मृती


चित्रस्मृती 
"त्रिदेव "च्या मुहूर्ताचे वेगळेपण....
    जाॅनी मेरा नाम ( १९७०) असं म्हणताक्षणीच दिग्दर्शक विजय आनंद आठवणारच....
      दीवार ( १९७३) आणि त्रिशूल ( १९७८) यश चोप्रांचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही...
     'विधाता ' सुभाष घईचा हे ओघात येतेच....
     या सुपर हिट चित्रपटाचे निर्माते आहेत गुलशन राॅय! हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे आघाडीचे वितरक आणि निर्माते.
यासह त्यांनी 'जोशिला ' ( दिग्दर्शक यश चोप्रा, १९७३) आणि 'युध्द ' ( दिग्दर्शक राजीव राॅय, १९८५) या चित्रपटांचीही निर्मिती केली, पण त्यांना यश लाभले नसले तरी गुलशन राॅय म्हटलं की ताडदेवच्या आपल्या त्रिमूर्ती फिल्म या निर्मितीच्या ऑफिसमधून ठीक दोन वाजता नाझमधील आपल्या माॅडर्न मुव्हीज वितरण ऑफिसात येणार असे वेळेचे पक्के!
    एका अतिशय प्रतिष्ठित आणि चित्रपट व्यवसायात दबदबा असलेल्या निर्मात्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला जास्तीत जास्त गर्दी ही अनेक आघाडीचे निर्माते आणि थिएटरवाले यांचीच असणार यात आश्चर्य ते काय?
     अंधेरीच्या नटराज स्टुडिओत 'त्रिदेव ' ( १९८९) च्या मुहूर्ताला हजर राहताना आघाडीचे अनेक निर्माते दिसले, तसेच याच स्टुडिओत ऑफिस असलेले रामानंद सागर, शक्ती सामंता , प्रमोद चक्रवर्ती, आत्माराम, उमेश मेहरा हेदेखील आवर्जून हजर दिसले. त्या काळात गुलशन राॅय यांच्या माॅडर्न मुव्हीजने आपला चित्रपट रि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.