बहुआयामी रे ...


जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष ! फिल्म सोसायटीची मुहूर्तमेढ भारतात रोवणाऱ्या सत्यजित राय यांनी पाथेर पांचाली या अभिजात चित्रपटाची निर्मिती करून भारतीय चित्रपटांना जागतिक पटावर मानाच स्थान मिळवून दिलं. वास्तव रूपवाणीच्या माध्यमातून सत्यजित राय यांचं  कार्यकर्तृत्व आम्ही विविध लेखातून सादर करत आहोत.

बहुआयामी रे ...

सिनेमाकडे कसं बघावं किंवा सिनेमा कसा बघावा याविषयीची जागृती, शिक्षण आणि त्याबाबतच्या चळवळी किंवा साधनं यांचं प्रमाण भरपूर नसलं तरी आज पुरेसं आहे. कलेकडे कसं बघावं याचंही शिक्षण दिलं जाणं हे उत्तम समाजाचं लक्षण आहे. पण या सगळ्यांत एक व्यक्ती किंवा माणूस एकाच वेळी अनेक कलांत निपुण किंवा उत्कृष्ट असेल तर ? त्याच्याकडे, त्याच्या कलेकडे, एकत्रित किंवा स्वतंत्र किंवा सहसंबंधाने कसं बघावं यावर मात्र आपल्याला अजूनही स्पष्ट धारणा, मार्ग किंवा रचना मिळालेली नाही. अर्थातच आपल्याकडे अशी व्यक्तिमत्त्वं नाहीत असा काही मुद्दा कुणी मांडू बघत असेल तर त्याला काहीच आधार नाही हे देखील सत्य आहे. आपल्याकडे असे अनेक लोक होते, होऊन गेले आहेत आणि आताही आहेत. परंतु एकतर ते प्रचंड प्रसिद्ध नाहीत किंवा प्रसिद्ध असलेच तर कुठल्याही एका कलेच्या प्रसिद्धीत त्यांच्या इतर, कदाचित अधिक उजव्या कला झाकोळल्या गेल्यात. अर्थातच बऱ्याच बाबतीत अर्थार्जन हाही एक मुद्दा आहेच. पण कुठल्याही स्वरूपात किंवा रचनेत विचार केल्यास अशी व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्यावर झालेल्या अभ्यासाच्या दिशा काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात अपुऱ्या किंवा कुठेतरी एका बाजूला झुकलेल्या दिसतात.
...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. rmjadhav

      10 महिन्यांपूर्वी

    छान लेख आहे, रे साहेबांच्या बद्दल खरंच अशी मराठी भाषेत ही माहिती मिळावी, खुपच शुभेच्छावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen